बनावट गुटखाप्रकरणी १९ जणांना कारवाईच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मिरज - मुसा जमादार आणि त्यांच्या मुलांना बनावट गुटखा बनविण्यास सहाय्य केल्याप्रकरणी आणखी १९ जणांना केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष विभागाने नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये काही वर्षांपूर्वी गुटखानिर्मितीत ‘गुटखाकिंग’ म्हणून मिरवणाऱ्यापासून ते बनावट गुटख्यासाठी सुपारी, सुंगधी तंबाखू पुरवणाऱ्यांसह हा बनावट गुटखा विकणाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

मिरज - मुसा जमादार आणि त्यांच्या मुलांना बनावट गुटखा बनविण्यास सहाय्य केल्याप्रकरणी आणखी १९ जणांना केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष विभागाने नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये काही वर्षांपूर्वी गुटखानिर्मितीत ‘गुटखाकिंग’ म्हणून मिरवणाऱ्यापासून ते बनावट गुटख्यासाठी सुपारी, सुंगधी तंबाखू पुरवणाऱ्यांसह हा बनावट गुटखा विकणाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. या सर्वांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिरज-मंगसुळी रस्त्यावर आरग गावानजीक निर्जन ठिकाणी बेमालूमपणे सुरू असलेल्या बनावट गुटख्याच्या कारखान्यावर केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष पथकाने १७ फेब्रुवारी २०१७ रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये लाखो रुपयांची यंत्रसामग्री, गुटखा तयार करण्यासाठीचे साहित्य पथकाने जप्त करून कारखान्यातील ११ जणांना अटक केली.

नोटिसा बजावलेल्यांची नावे...
१) अरुण जोशी आणि त्यांचा मुलगा गौरव जोशी (रा. ठाणे ) २) बापू बबन गडदरे ३) भरतेश सिद्धराम कुडचे ४) गणेश सातपुते ५) शिशुपाल जयपाल कांबळे ६) फिरोज शेख ७) वसीम मुजावर ८) इब्राहिम मुजावर (सर्वजण रा. मिरज), ९) राजनंदिनी फूडस १०) मुकेश त्रिवेदी ११) संपत राठोड १२) भरत देवरा १३) मुकेश शर्मा (सर्वजण रा. सौंदलगा, कर्नाटक), १४) प्रकाश नरसिंगानी १५) ग्यान नरसिंगानी (दोघे रा. कोल्हापूर) १६) महेश नानवाणी १७) नरेश नानवाणी (दोघे रा. सांगली १८) गुलशन अग्रवाल (ठाणे) आणि १९) पॅकोपॅक इंडस्ट्रीज (वापी, गुजरात ) 

या बनावट गुटख्याचा कारखाना चालविणारा मुख्य सूत्रधार म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने मुसा जमादार, त्याची दोन मुले फिरोज आणि फारुख यांनाही अटक  करून त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीमध्ये आणि त्यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या  तपासणीमध्ये या बनावट गुटखा बनवण्यासाठी भारत आणि भारताबाहेरही आंतरराष्ट्रीय गुटखाकिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यावसायिकासह गुजरात, कर्नाटक, गोवा, ठाणे येथील अनेकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले.

या सर्वांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहेच. शिवाय काही जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. यामध्ये काही उत्पादकांचे कारखानेही याच पथकाने सील केले आहेत. बनावट गुटख्यासाठी प्लास्टिकच्या रिकाम्या पुड्या पुरवणाऱ्या एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा कारखान्यावरही धाड टाकून पथकाने त्याच्याविरुद्धही वसुलीची कारवाई सुरू केली आहे.

बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारी कच्ची सुपारी, सुंगधी तंबाखू तसेच अन्य साहित्य पुरवाणाऱ्या व्यापाऱ्यांकडील कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याकडूनही काही पुरावे हस्तगत केले आहेत. तयार झालेला बनावट गुटखा विकल्याप्रकरणी मिरज, इचलकरंजी, निपाणी, गोवा येथील काही व्यापाऱ्यांचीही चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांनाही याच विभागाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार  असल्याचे या पथकाच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Sangli News Illegal Gutaka case