जंतनाशक गोळ्या वापराच्या पद्धतीवर संशय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सांगली - ढवळेश्‍वर (ता. खानापूर) येथे अंगणवाडीतील मुलांना ‘अल्बेनडझॉल’ जंतनाशक गोळ्यांत दोष असल्याने बाधा झाली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. त्याचा मुंबई ड्रग कंट्रोलचा अहवाल अखेर दीड महिन्यानंतर प्राप्त झाला. त्यामुळे मुलांना उपाशी पोटी गोळ्या दिल्या गेल्या किंवा त्यांनी त्या चावून खाण्याऐवजी थेट गिळल्यामुळे बाधा झाली असावी, असा संशय आहे. 

दीड महिन्यांपूर्वी ढवळेश्‍वर येथे अंगणवाडीतील मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या. या गोळ्यांमुळेच त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. गोळ्यांचा जिल्ह्यातील वापर थांबवून साठा परत मागवण्यात आला. मुलांना उपाशीपोटी गोळ्या दिल्या गेल्या, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला; परंतु या गोळ्यांत दोष आहे किंवा नाही आणि असेल तर काय, याचा उलगडा होण्यासाठी त्या प्रयोगशाळेला पाठवल्या होत्या.

या गोळ्या जागतिक आरोग्य संघटनेने ग्लॅक्‍सो स्मिथ क्‍लिन या कंपनीकडून बनवून घेतल्या असल्याने हा प्रश्‍न अधिकच गंभीर झाला होता. त्याचा अहवाल अखेर प्राप्त झाला आहे. या गोळ्या निर्धोक असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे गोळ्यांचा विषय मिटला आहे. 

आता या मुलांना बाधा कशामुळे झाली, या प्रश्‍नाचे उत्तर आरोग्य विभागाला शोधावे लागणार आहे. प्राथमिक माहितीनुसार गोळ्या उपाशीपोटी दिल्या गेल्याची माहिती पुढे आली होती. काहींनी त्या न चावता थेट गिळल्या असाव्यात. त्यामुळेही बाधा होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मुलांसाठी औषधपुरवठा करताना त्याच्या वापराविषयी सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण संबंधित यंत्रणेला द्यावे लागेल, एवढाच निष्कर्ष यातून निघण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sangli news improper use of wormicide tablets