सांगलीत चारचाकींच्या ब्रेक तपासणीसाठी भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सांगली - व्यावसायिक चारचाकी वाहनाचा नवीन परवाना आणि परवाना नूतनीकरणासाठी आवश्‍यक ट्रॅक निर्मितीत अडथळे येत असल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग पाटगाव (ता. मिरज) येथे हा ट्रॅक बनवत असून त्याला अजून किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. तोवर कोल्हापूर किंवा कऱ्हाड येथे जाऊन  तपासणी करून घ्यावी लागत आहे.

वाहन परवाना नूतनीकरणाचे निकष कडक करावेत, यासाठी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने चारचाकी वाहनांची शास्त्रशुद्ध तपासणी बंधनकारक केली आहे. 

पाटगावमध्ये ट्रॅक बनवण्याचे काम सुरू आहे, मात्र  काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या सोडवण्याबाबत प्रयत्न सुरू असून पुढील महिनाभरात हे काम मार्गी लागेल. तोवर कऱ्हाड, कोल्हापूरमध्ये एकेक अधिकारी नेमून वाहनांचे परवाने दिले जात आहेत.’’
- दशरथ वाघुले,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

सांगली उपप्रादेशिक परिवहन विभागाची कुपवाड औद्योगिक वसाहतीतील जागा वादात अडकल्याने  पाटगाव येथे ट्रॅकसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तेथे ट्रॅक बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, तिथेही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जमिनीखालून गेल्याने अडचणी आल्या आहेत. ती जागा न उकरता उंची वाढवण्याचा पर्याय आहे, मात्र त्याच ठिकाणाहून महावितरणची वीज वाहिनी जाते. त्या वाहिनीची जागा बदलल्यास ट्रॅकमधील अडथळे दूर होऊ शकतील. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महिना लागेल.

तथापि सध्या परवाना नूतनीकरणासाठी येणाऱ्या सरासरी चाळीस ते पन्नास वाहनांची खोळंबा होत आहे. नवीन वाहनाचा परवाना जारी करतानाही ब्रेक तपासणी, रेडियम तपासणी केली जाते. मुहूर्त असलेल्या दिवशी सरासरी  दहा ते बारा वाहने तपासणीला येत असतात. या वाहनांसाठी सध्या कऱ्हाड आणि कोल्हापूर या ठिकाणी पर्यायी सोय केली आहे. तेथे सांगलीचे अधिकारी सकाळ सत्रात  ‘ड्यूटी’ करतात. कॅमेऱ्यासमोर ही तपासणी केली जाते. सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा डांबरीकरण केलेला ट्रॅक या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. पाटगावचा ट्रॅक पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांना कऱ्हाड, कोल्हापूरच्या फेऱ्या अटळ आहेत.

Web Title: Sangli News issue of Break Checkup of Four wheeler