वन्यजीवमध्ये ‘रितू’ ची उपासमार

संग्रामसिंह पाटील
गुरुवार, 28 जून 2018

इस्लामपूर - सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयातील पथकात सामील श्‍वान ‘रितू’ हिच्या डॉगफूड, दूध, मटणासाठीचा खर्च चार महिन्यांपासून मिळत नाही. तिला पुरेशा आहार देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे तिची उपासमार सुरू आहे. ‘रितू’ची मुलीप्रमांणे देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  पदरमोडीची वेळ आली आहे. 

इस्लामपूर - सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयातील पथकात सामील श्‍वान ‘रितू’ हिच्या डॉगफूड, दूध, मटणासाठीचा खर्च चार महिन्यांपासून मिळत नाही. तिला पुरेशा आहार देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे तिची उपासमार सुरू आहे. ‘रितू’ची मुलीप्रमांणे देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  पदरमोडीची वेळ आली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक (वन्यजीव) कऱ्हाड कार्यालयाचे अतिरिक्‍त कार्यालय इस्लामपूर येथे आहे. २०१५ मध्ये स्वतंत्र इमारत बांधून श्‍वान पथक तयार करण्यात आले. पथकात ‘रितू’ ही जर्मन शेफर्ड जातीची श्‍वान भोपाळ (मध्यप्रदेश) येथून प्रशिक्षण देऊन  आणली. रितू जंगलात कोणी शिकार करून जात असेल तर ते शोधून काढण्याचे काम करते. शिकार करून गेल्यानंतर त्या जागेचा वास घेऊन रितू तस्करांच्या घरापर्यंत पोचू शकते. 

रितू श्‍वानासाठी दर महिन्याला १० हजार रुपये खर्च मिळतो. एप्रिलपासूनचा खर्च मिळालेला नाही. मागणी केली आहे. दोन लवकरच रक्कम जमा होईल.
- आर. एम. विधाते, 

सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) अधिकारी, इस्लामपूर.

प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या तपासणीसही तिची मदत होते. रात्री गस्त घालण्यात तिची वनरक्षकांना साथ मिळते. तिच्या देखभालीसाठी दोन वनरक्षक नेमलेत. 

कर्मचाऱ्यांची पदरमोड 
ती बकऱ्याचेच मटण खाते. डॉगफूड बॅगेची किंमत ५ हजारांवर गेली आहे. गेले चार महिने बिले पाठवूनही रितूला लागणारा खर्च आलेला नाही. श्‍वानाला लागणाऱ्या मटण व दुधाची उधारी चार महिने थकली आहे. वारंवार मागणी करून ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ‘रितू’ची उपासमार सुरू आहे. देखभाल करणारे कर्मचारी पदरमोड करीत खर्च करीत असले तरी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांची बिले मंजूर होतात. ‘रितू’ची उपासमार होऊ नये म्हणून कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्‍ठा करीत आहेत.

अशी आहे रितू..
 जात ः जर्मन शेफर्ड 
 वय ः ४ वर्षे
 उंची ः २ फूट ३ इंच
 वजन ः ३० किलो 
 कोठून आणले ः हैदराबाद 
 प्रशिक्षण ः भोपाळ                       (मध्यप्रदेश)

रितूचा आहार
 दूध ः दररोज एक लिटर
 मटण ः अर्धा किलो 
 पेट फूड ः पेडीगिरी

Web Title: Sangli News issue of expenditure on Ritu Dog