जत नगरपालिका उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

जत - जत नगर परिषद उपनगराध्यक्ष निवडीवेळी अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली. संख्याबळ नसल्याने भाजपने विरोधी बाकावर बसण्याचे मान्य करत उपनगराध्यक्षपदासाठी अर्जच दाखल केला नाही. 

जत - जत नगर परिषद उपनगराध्यक्ष निवडीवेळी अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली. संख्याबळ नसल्याने भाजपने विरोधी बाकावर बसण्याचे मान्य करत उपनगराध्यक्षपदासाठी अर्जच दाखल केला नाही. 

स्वीकृत नगरसेवकपदासाठी काँग्रेसच्या वतीने ऐनवेळी पक्षहित लक्षात घेऊन इराणणा निडोणी यांनी माघार घेतल्याने तानाजी बामणे स्पोर्टस्‌ क्‍लबचे संस्थापक अध्यक्ष नीलेश बामणे यांची निवड करण्यात आली. भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यासमक्ष गटनेता न निवडल्याने विरोधी गटातून निवडण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांची निवड पुढे पुन्हा एकदा विशेष सभा बोलावून करण्यात येणार आहे. 

गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, मुख्याधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. उपनगराध्यक्षांसाठी एकमेव राष्ट्रवादीचे नगरसेवक आप्पासाहेब पवार यांचा अर्ज दाखल झाला होता. दुपारी बारा वाजता नगराध्यक्षा  शुभांगी बन्नेनवर यांनी उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब  पवार यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 

यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, रमेश पाटील, मच्छिंद्र वाघमोडे, बाजी  केंगार, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, तम्मा सगरे यांच्यासह काँग्रेसचे नूतन नगरसेवक माजी नगराध्यक्ष इकबाल ऊर्फ पट्टू गवंडी, नामदेव काळे, भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, सौ. गायत्रीदेवी शिंदे, अश्विनी माळी, कोमल शिंदे, भाजपचे नगरसेवक विजय ताड, प्रमोद हिरवे, प्रकाश माने, दीप्ती सावंत, श्रीदेवी सगरे, जयश्री शिंदे, जयश्री मोटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक आप्पा पवार, स्वप्नील शिंदे, टिमु एडके, वनिता साळे, भारती जाधव, बाळाबाई मळगे आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News Jat Nagarpalika Election