दंगल थोपविता न येणे हे राज्य सरकारचे अपयश - जयंत पाटील

धर्मवीर पाटील
रविवार, 13 मे 2018

इस्लामपूर - औरंगाबादमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेली दंगल थोपविता न येणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका करून पोलीस खात्याने या शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याबरोबर दंगलखोर मग ते कोणत्याही धर्माचे, पक्षाचे असोत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केली.

औरंगाबाद येथील दंगलीबाबत येथील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमंदार पाटील बोलत होते. ही दंगल पूर्व नियोजित होती काय? तसेच अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करून कोणी तरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे काय? असे सवालही त्यांनी याप्रसंगी बोलताना उपस्थित केला.

आमदार पाटील म्हणाले, औरंगाबाद येथे क्षुल्लक कारणावरून दोन समुदायामध्ये रात्री उशिरा दंगल सुरू झाली. या शहरातील  आमच्या कार्यकर्त्यानी मला फोन करून घटनेची कल्पना दिली. त्यानंतर लगेचच मी पोलीस कमिशनरशी बोललो. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणत आहोत, असे सांगितले. सकाळी ९ वाजता दंगल आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आलेले दिसते.

आमदार पाटील म्हणाले, या दंगलीत दोघांना प्राण गमवावे लागले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रात्रीच्या दगड फेकीत ५०० च्या वर लोक जखमी झाले आहेत. या दंगलीत पेट्रोल बॉम्बचा वापर होणे हे गंभीर आहे. पोलीस खात्याने आता या भागात शांतता कशी नांदेल, हे पाहावे. आणि ज्यांनी-ज्यांनी या दंगलीत पुढाकार घेतला आहे, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. यासाठी त्यांना सिसिटीव्ही फुटेज व लोकांची मदत घेता येईल. दोन्ही समाजाच्या लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Sangli News Jayant Patil comment