वीजबिल, पाणीपट्टीची आता चिंता मिटली - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

तासगाव - ‘आता काय आपल्याच घरात महामंडळ ! चांगलेच झाले. तासगाव तालुक्‍यातच कृष्णा खोरे महामंडळ आल्याने आता पाण्याचा, वीजबिलाचा आणि पाणीपट्टीचा प्रश्‍न कायमचा सुटला. चिंता मिटली; त्यामुळे आता ती कुणी कुणाला मागायची गरज उरली नाही,’ असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज काढला. निमित्त होते त्यांच्या सत्कार समारंभाचे.

तासगाव - ‘आता काय आपल्याच घरात महामंडळ ! चांगलेच झाले. तासगाव तालुक्‍यातच कृष्णा खोरे महामंडळ आल्याने आता पाण्याचा, वीजबिलाचा आणि पाणीपट्टीचा प्रश्‍न कायमचा सुटला. चिंता मिटली; त्यामुळे आता ती कुणी कुणाला मागायची गरज उरली नाही,’ असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला. निमित्त होते त्यांच्या सत्कार समारंभाचे.

तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा कार्यक्रम झाला. आमदार सुमन पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष श्रीमती अनिता सगरे, सुरेश पाटील, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, सभापती बेबीताई माळी, उपसभापती संभाजी पाटील आदी या वेळी उपस्थित होते. पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अविनाशकाका पाटील यांची निवड झाली. 

आपल्या नेहमीच्या शैलीत जयंतरावांनी आज पूर्वाश्रमीचे समर्थक खासदार संजय पाटील यांना चिमटा काढताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देसाई यांच्याकडे कटाक्ष टाकत जयंतराव म्हणाले,‘‘आप्पा, तुमच्याकडे कृष्णा खोरे मिळाल्याचे समजले !’’ असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उसळला. ‘‘हसू नका. आता पाणीपट्टी मागायची नाही की विजबील मागायचे नाही. महामंडळ आपलेच आहे. जिल्ह्याला ‘कृष्णा खोरे’ महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले आहे. त्यामुळे आपल्याच कंपनीतील माल खरेदी करताना कोणी पैसे मागते का ? मात्र आता पाणी द्यायची जबाबदारी तुमचीच.’’ श्रीमती सगरे म्हणाल्या,‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचले पाहिजेत.’’

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे. 
 - सुमन पाटील,
आमदार

Web Title: Sangli News Jayant Patil comment