परदेशी वऱ्हाडींशी माजी मंत्री जयंत पाटील यांचा संवाद

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

इस्लामपूर - दक्षिण कोरियातून वाळवा तालुक्यातील बागणी  येथे चि. सावंता माळी यांच्या लग्नास वऱ्हाडी मंडळी आली होती. या वऱ्हाडी मंडळींशी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी अस्सलिखीत इंग्रजीमधून संवाद साधला व त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.  

बागणीचे सावंता माळी हे दक्षिण कोरियामध्ये "शास्त्रज्ञ" म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विवाह जाखले (ता.पन्हाळा) येथील चि. सौ. का. ज्योती हिच्याशी यशोदत्त मंगल कार्यालयात झाला. या लग्नासाठी दक्षिण कोरियावरून सावंता यांचे वरिष्ठ व सहकारी आले होते. आमदार जयंत पाटील यांनी जेंव्हा या लग्नास भेट दिली तेव्हा वधू-वरास शुभाशिर्वाद तर दिलेच; शिवाय दक्षिण कोरियावरून आलेल्या वऱ्हाडी मंडळींशी गप्पा मारल्या. आमदार पाटील यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व, त्यांचा अभ्यास व कार्य ऐकून कोरियाकर देखील प्रभावित झाले.

सावंता यांचे वडील संभाजी माळी हे एक साधे शेतकरी आहेत. मात्र त्यांनी जिद्द व इर्षेने सावंता यांना उच्च शिक्षण दिलेच; शिवाय दुसरा मुलगा नाशिक येथील मिल्ट्रीच्या विमान निर्माणमध्ये इंजिनिअर आहे. आणि मुलगीने नुकतीच पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांच्या कर्तृत्वाचीही चर्चा विवाहस्थळी उमटून गेली.

Web Title: Sangli News Jayant Patil talk with foreign Guest