कडेगावात गगनचुंबीच्या ताबूतांच्या अलोट गर्दीत भेटी

संतोष कणसे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणारे गगनचुंबी ताबूत, महाराष्ट्र कर्नाटकातून आलेले पन्नास हजारांवर भाविक. अलोट उत्साह. "दुला दुला' व "मौला अली...'च्या जयघोषात येथे आज मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा अपूर्व सोहळा पाटील वाडा चौकात झाला.

दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या मोहरमनिमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी सकाळी पारंपारिक पध्दतीने वाद्यांच्या गजरात ताबूतांची पूजा केली. दुपारी बारा वाजता सातभाईंचा मानाचा ताबूत प्रथम उचलण्यात आला. त्यानंतर ताबूत भेटीचा सोहळा सुरू झाला.

साडेबारा वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. दोन्ही ताबूतांची पाटील वाडा चौकात दोन वाजता भेट झाली. ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले. वाटेत शेटे, आत्तार, देशपांडे, हकीम, तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. पाटील वाडा चौकात शेख-इनामदार तसेच सुतार यांचे सर्वात उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले. देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आले.

बुधवार पेठ मेल व शुक्रवार पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले. राष्ट्रीय एकात्मतेची गीते गाण्यात आली. मानकऱ्यांनी ताबूतांचे पूजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या सुमारे 50 हजारांवर भाविकांच्या अलोट उत्साह आणि "दुला दुला' व "मौला अली...' च्या जयघोषात मोहरमनिमित्त मानाप्रमाणे ताबूतांच्या भेटीचा सोहळा येथील पाटील वाडा चौकात झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.

खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, बाळासाहेब पाटील, चंद्रसेन देशमुख, रविंद्र देशपांडे, गुलाम पाटील, सुरेश निर्मळ, मुन्ना शेख, दीपक भोसले, धनंजय देशमुख, विजय शिंदे, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, नगरसेवक दिनकर जाधव, उदयकुमार देशमुख, सागर सूर्यवंशी, राजू जाधव, नितिन शिंदे, बापूराव जाधव, ज्ञानेश्‍वर शिंदे आदी तसेच लाखांवर हिंदु-मुस्लीम भाविक उपस्थित होते. आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: sangli news kadegaon moharam