कडेगावसाठी १२ उमेदवारांचे १४ अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कडेगाव - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांचेकडे दाखल केले.

कडेगाव - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांचेकडे दाखल केले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज अखेर १२ उमेदवारांनी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पक्षवार अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढील प्रमाणे :

विश्‍वजित पतंगराव कदम रा. सोनसळ (काँग्रेस), शांताराम मोहनराव कदम रा. सोनसळ (काँग्रेस), ॲड. प्रमोद गणपतराव पाटील, रा.चिंचणी (अपक्ष), सतिश सर्जेराव पाटील रा. अंकलखोप (अपक्ष), मोहन विष्णू राऊत रा. बनकरवाडी, ता. सांगोला (अपक्ष), संग्रामसिंह संपतराव यादव-देशमुख रा. कडेपूर (भाजप), पृथ्वीराज सयाजीराव देशमुख रा.कडेपूर (भाजप), राजाराम विष्णू गरुड रा. कडेपूर (भाजप), अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले, रा.सातारा (अपक्ष), बजरंग धोंडीराम पाटील रा. नागठाणे (अपक्ष), मिलींद काशीनाथ कांबळे रा. उल्हासनगर, मुंबई (हिंदुस्थान जनता पार्टी), विलास शामराव कदम रा.अंबक (अपक्ष).

Web Title: Sangli News Kadegaon - Palus ByElection