बंदला कागलात 100 टक्के प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कागल - कर्जमाफीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कागल शहरात कडकडीत बंद पाळून पाठिंबा देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादीच्यावतीने कागल बंद आंदोलन पुकरण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कागल शहरात घोषणाबाजी करीत उघडी असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले तसेच एस.टी.बस वाहतूक बंद पाडली. यावेळी शासन विरोधी घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गावरुन निषेध फेरी काढण्यात आली.गैबी चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.आठवडी बाजार बंदमुळे भरला नाही. 

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कागल पालिकेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. "शेतकऱ्यांचे हित न जपणाऱ्या व कर्जमुक्‍ती न करणाऱ्या शासनाचा निषेध असो" अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करीत शहराच्या प्रमुख मार्गावरील उघडी असणारी दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत फेरी काढण्यात आली.भूयेकर पंप, विराज सिटीमधील सर्व व्यवहार बंद केले. त्यानंतर घोषणा देत कार्यकर्ते बसस्थानकात शिरले व बस वाहतूक बंद पाडली. यामुळे परगावी नोकरीसाठी व कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. कागल पालिकेचे कामकाजही बंद पाडण्यात आले. 

निपाणी वेस भागात भरणारा सोमवारच्या बाजारातून ही फेरी काढण्यात आली. यावेळी भाजी विक्रेत्यांनी विक्री बंद करुन माल झाकून ठेवला. गैबी चौक येथे शासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक सतीश घाडगे,आनंदा पसारे,विक्रम चव्हाण, सुनिल माळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: sangli news kagal band farmerstrike