कवठेमहांकाळ पश्‍चिमेत तिरंगी सामना

शम्मू मुल्ला
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

शिरढोण - कवठेमहांकाळ पश्‍चिम भागात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी व बैठकांवर जोर वाढला आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या बालेकिल्ल्यात खासदार संजय पाटील यांच्या शिरकावने आता चांगलीच रंगत येणार आहे. स्व. आर. आर.  पाटील गटही येथे तगडा असल्याने आमदार सुमनताई पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असून येथे तिरंगी लढतींची शक्‍यता दिसत आहे. 

शिरढोण, बोरगाव, जायगव्हाण, लांडगेवाडी आदी गावात ग्रामपंचायतीवर घोरपडे गटाची सत्ता आहे. येथे तिन्ही गट सक्रिय आहेत. आर. आर. गटातून पं.स. माजी सभापती वैशाली पाटील, रजनीकांत पाटील आदींनी खासदार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे टी. व्ही. पाटील व शीतल पाटील, हणमंतराव शिंदे, मन्सूर  मुलाणी, आदी कार्यकर्ते असून आप्पालाल मुलाणी, रमजान मुलनी यांचे नाव सरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या गटात पुढे येऊ लागले आहे. घोरपडे गटातून जगन्नाथ गुरव, इमाम मुलानी, रघुनाथ हुलवान यांची नावे आघाडीवर आहेत.  

बोरगावमध्ये जनार्दन पाटील आदी कार्यकर्ते, लांडगेवाडीमध्ये सरपंच प्रशांत कदम, सुभाष कदम, बाबासाहेब कदम आदी कार्यकर्ते खासदार पाटील गटात गेले आहेत. तर मळणगावमध्ये आबांचे कार्यकर्ते प्रा. राजाराम  पाटील आदींनी खासदार गटात प्रवेश केला आहे. तसेच बोरगावमध्ये स्व. आर. आर. पाटील गटात गेलेले माजी उपसभापती बाबासाहेब पाटील हे माजी मंत्री घोरपडे  गटात स्वगृही परतले आहेत. त्यामुळे बोरगावात पुन्हा मोठा गट उभा राहिला आहे. 

अलकुड (एम) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका माजी अध्यक्ष भानुदास पाटील यांनी ऐन वेळी जि. प. व पंचायत समिती निवडणूकच्या दरम्यान काँग्रेस आयमध्ये प्रवेश केल्याने तसेच चंद्रकांत पाटील यांनी भाजप खासदार गटात प्रवेश केल्याने आता अलकुड (एम) मात्र यावेळी समीकरणे बदलणार आहेत.

Web Title: sangli news kavtemahankal taluka grampanchayat election