खरसुंडी देवस्थानातील ऊर्जा प्रकल्प दुरुस्ती अभावी बंद

नागेश गायकवाड
रविवार, 20 मे 2018

आटपाडी - पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प दुरुस्ती अभावी गेली तीन वर्षे बंद आहे. दुरुस्ती कोण करणार यावरून विश्वस्त आणि पुजारी यांच्यात वाद असून यावर मार्ग निघालेला नाही.  

आटपाडी - पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प दुरुस्ती अभावी गेली तीन वर्षे बंद आहे. दुरुस्ती कोण करणार यावरून विश्वस्त आणि पुजारी यांच्यात वाद असून यावर मार्ग निघालेला नाही.  

2004 मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री विनयकुमार कोरे यांनी खरसुंडीचे सिद्धनाथ आणि रेणावीचे रेवणसिद्ध मंदिरासाठी सौर आणि पवन ऊर्जा असा संयुक्तिक प्रकल्प उभा केला होता. सुरवातीला हा प्रकल्प उत्तम प्रकारे सुरू होता. काही दिवसानंतर वीज साठवणूक करणाऱ्या बॅटऱ्या खराब झाल्यामुळे बंद पडला. त्यानंतर देवस्थान समीतीनेची दुरुस्ती करून प्रकल्प सुरू केला. त्यानंतर पुन्हा तो बंद पडला. या प्रकल्पाला 14 वर्षे होत आली मात्र तो जास्त काळ बंद राहिला आहे. सध्याही हा प्रकल्प बॅटरी खराब झाल्यामुळे दुरुस्ती अभावी बंद आहे.

सौर आणि पवन ऊर्जेचे देखभाल - दुरुस्ती करण्यावरून पुजारी आणि विश्वस्त यांच्यात वाद आहे. दोघेही दुरुस्तीसाठी परस्परांकडे बोट दाखवतात. जनरेटरला डिझेल कोणी द्यायचे यावरून विश्वस्त आणि पुजारी यांच्यात रोज वादावादी होते.      

  • सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प अंदाजपत्रक  -14 लाख           
  • बॅटरी संख्या - 40 
  • नवीन बॅटरीसाठी अपेक्षित खर्च - सात लाख 
  • मंदिराचे महिन्याचे वीज बिल - पंधरा हजार रूपये.     

देवस्थानचा सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प बॅटरी खराब झाल्यामुळे बंद आहे. लवकरच दुरुस्ती किंवा त्याला पर्याय मार्ग काढून दुरुस्त केला जाणार आहे.

-  भाऊसो पुजारी, अध्यक्ष, श्रीनाथ ट्रस्ट खरसुंडी

Web Title: Sangli News Kharsundi Devasthan energy project wants to repair