कोकणचा आंबा थेट ग्राहकांपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सांगली - सांगली बाजार समितीच्या आवारात बाजार समिती व सहकार विभागातर्फे कोकणातील  शेतकरी आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. आंबा दररोज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट ग्राहकासाठी अशी ही सोय आहे, अशी माहिती सभापती दिनकर पाटील यांनी आज दिली. पुढील आठवड्यापासून सुरवात केली जाणार आहे. 

ते म्हणाले,‘‘कोकणात पिकविलेला आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी मंडप,  निवास व्यवस्था मोफत करून दिली जाईल. ग्राहकांनी खरेदी केलेला आंबा खराब लागला तर तो परत घेतला जाणार आहे. शिवाय कोकणचा म्हणून अन्य भागातील आंबा विकला जाणार नाही. योजनेमुळे शेतकऱ्यांना दोन रुपये जादा मिळून ग्राहकांनाही कमी दरात आंबा मिळणार आहे.’’

Web Title: sangli news konkan mango direct to customer