विटा येथे दलित संघटनेतर्फे निषेध मोर्चा 

प्रताप मेटकरी
बुधवार, 3 जानेवारी 2018

विटा - कोरेगाव - भीमा येथील येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. 3) बुधवारी विट्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव भीमा येथील घटनेतील गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दलित संघटनांच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, कोरेगाव घटनेतील गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत विविध दलित संघटनांनी विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.     

भारिप बहुजन महासंघ, दलित महासंघ, रिपाईसह दलित संघटनांनी आज सांगली बंदची हाक दिली होती. बंदला पाठिंबा म्हणून विटा शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद पाळण्यात आला. या बंदला पाठिंबा देत शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.      

विटा नगरपालिकेचे नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष एल. एम. खरात, डॉ राजन भिंगारदेवे, बसपचे दत्ताभाऊ नलवडे, गणेश माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष काका ऐवळे, समतावादी दलित महासंघाचे संदीप ठोंबरे , सुरेश ऐवळे, रवींद्र साठे  उपस्थित होते. 

Web Title: Sangli News Koregaon Bhima Riots Vita Band