संभाजीराव भिडेंवरील आरोपांच्या निषेधासाठी २८ ला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिलांच्या बैठकीत करण्यात आले. 

सांगली - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिलांच्या बैठकीत करण्यात आले. 

‘शिवप्रतिष्ठान’तर्फे बुधवारी (ता. २८) सांगलीसह राज्यभरात विविध जिल्ह्यांत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या आयोजनासाठी शहरातील महिलांची बैठक आयोजित केली होती. पुष्पराज चौकातील महामोर्चा कार्यालयात सायंकाळी झालेल्या या बैठकीस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजीराव भिडे यांच्यावर झालेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी जिल्हाभरात मोठी संपर्क मोहीम राबविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. या वेळी बोलताना महिलांनी भिडे यांच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. 

या वेळी बोलताना कमल माळी यांनी, भिडेंवरील अन्यायाच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चाची शासनाने दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे नियोजन करण्याची मागणी केली. प्रतिभा पाटील यांनी, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीस पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान राज्यभरात हिंसाचार होऊन जे नुकसान झाले, त्याची नुकसानभरपाई शासनाने भरू नये, असे मत व्यक्त केले. या वेळी रागिणी वेलणकर, उषा बापट आदींनी आपली मते व्यक्त केली. ‘शिवप्रतिष्ठान’चे कार्यवाह नितीन चौगुले यांनी, मोर्चा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. या वेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Web Title: Sangli News Koregaon Bhima Violance isssue