भिडे, एकबोटेंच्या नार्को चाचणीची वीर शिदनाक यांच्या वंशजांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सांगली - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची नार्को टेस्ट करावी, या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज वीर शिदनाक यांच्या वंशजांनी पत्रकार बैठकीत केली.

सांगली - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची नार्को टेस्ट करावी, या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज वीर शिदनाक यांच्या वंशजांनी पत्रकार बैठकीत केली.

दोन दिवसांपुर्वी वीर शिदनाक यांचे वंशज अभिजित इनामदार यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेंना पाठिंबा जाहीर करुन ते दलित विरोधी नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर अन्य वंशजांनी आज एकत्र येत भिडेंच्या विरोधात भूमिका मांडताना नार्को टेस्टची मागणी केली. 

कोरेगाव भीमा युध्दातील महार बटालियनचे सरसेनापती वीर शिदनाक यांची कळंबीत समाधी आहे. त्यांचे वंशज अभिजित इनामदार, प्रमोद इनामदार, मिलिंद इनामदार, राहुल इनामदार, निवास इनामदार, शैलेंद्र इनामदार, प्रकाश इनामदार, कुमार इनामदार, बाळासो इनामदार यांच्यासह रिपाई नेते सुरेश दुधगावकर, किरणराज कांबळे, उत्तम कांबळे, प्रमोद कुदळे, असिफ बावा उपस्थित होते. या सर्वांनी दंगल प्रकरणी दोषींवर मणुष्य हत्येचे गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी केली. त्यांनी मांडलेली भूमिका अशी ः हिंदुत्ववादी संघटना जाती जातींत तेढ निर्माण करुन फूट पाडत आहेत. भिडेंची विधाने समाजात फुट पाडणारी असून त्यांनीच कोणत्याही चौकशीला सामोरे जायची तयारी दर्शवली आहे तर आता त्यांची नार्को टेस्ट करा करावी.'' 

अभिजित यांची दिलगिरी 
शिव प्रतिष्ठानच्या बैठकीत उपस्थित असलेले वंशज अभिजित इनामदार यांनी आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी खुलासा केला. त्याबाबत ते म्हणाले,"" शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो. मी आजही बहुजन समाज व आंबेडकरी चळवळीसोबतच आहे.'' 

Web Title: Sangli News Koregaon Bhima Violance isssue