कोयना, वारणा 90 टक्के भरले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सांगली - जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. वारणा आणि कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे दोन्ही धरणे 90 टक्केहून अधिक भरलेली आहेत. जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 32.59 टीएमसी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी. एवढी आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 90.14 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. धोम धरणात 10.25 टीएमसी, कन्हेर धरणात 9.10 टीएमसी. पाणीसाठा आहे. 

जिल्ह्यात सोमवारपासून म्हैसाळ, टेंभू योजनांचे पंप सुरू केले आहेत. योजनांच्या कार्यक्षेत्रातील पिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी तलाव भरून घेतल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. जिल्ह्यातील कोयना धरणावर टेंभू आणि कोयना आणि वारणा धरणातील पाण्यावर म्हैसाळ पाणी योजनांना पाणीपुरवठा होते. सिंचन योजना सुरू झाल्याने शेतकरी आणि पिण्याचे पाणी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्थात दोन्ही धरणे 90 टक्के भरल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या 70 टक्के पेरण्या झाल्या होत्या. दोन दिवसांत राज्यभर पाऊस पडला तरी जिल्हा रेडझोनवर कायम राहिला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांची वाढ न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांच्या वाढी खुंटल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पीक परस्थितीत फारसा बदल होणार नाही. पडलेला पाऊस वेळेत न झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होतानाचे चित्र नाही. 

जिल्ह्यात ऐन पावसाळी हंगामात 145 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, यावरून जिल्ह्यातील टंचाईची कल्पना येते. 

तालुकानिहाय पाऊस (मि.मी) 
जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत सरासरी 1.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
मिरज 1.6, जत 0.8, खानापूर-विटा 0.6, तासगाव 2.2, शिराळा 2.7, ,आटपाडी 0.3, कवठेमहांकाळ 1, पलूस 1 व कडेगाव तालुक्‍यात 1.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाळवा-इस्लामपूर तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली आहे.

Web Title: sangli news koyan dam Warna Dam rain