कृष्णा काठावर ढोल घुमू लागले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सांगली - कृष्णा काठावरील माई घाटावरील रम्य सायंकाळ आता ढोल-ताशांनी निनादू लागली आहे. ढोल घुमू लागलेत आणि गणेशोत्सवाच्या तयारीचीही चाहूल त्यांनी दिली आहे. "नादप्रतिष्ठा' मंडळाची दररोज तालीम रंगते आहे. तरुणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ढोलवादन लक्ष वेधू लागले आहे. 

गणेशोत्सवात डॉल्बी बंदीनंतर पारंपरिक वाद्यांना "अच्छे दिन' आले. गेल्या दोन-चार वर्षांत केवळ ढोल-ताशाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात मंडळांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच यांच्या मागणीत वाढ झाली. दर्जाही तसाच आल्याने वर्षभरापूर्वीच काही मंडळांकडून बुकिंग केले जाते. त्यातीलच "नादप्रतिष्ठा' मंडळ आहे. या ग्रुपने यावर्षी 75 जणांचे ढोल पथक केले आहे. त्यांची तालीम कृष्णाकाठी लक्ष वेधू लागली आहे. याचा आनंद घेण्यासाठी बघ्यांचीही तोबा गर्दी असते. नाद प्रतिष्ठाच्या सरावाचे उद्‌घाटन "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले,""नाद प्रतिष्ठाने आपला लौकिक राज्यभरात निर्माण केला आहे. नाट्य पंढरी सांगली विविध कलांनी समृद्ध आहे. ढोल वादकांनी कलेतही सांगलीचे ब्रॅंडिंग करावे. यावेळी महापालिकेचे अधिकारी नितीन शिंदे, अजय कडणे, आशिष वालावलकर, स्वप्नील बेलवलकर, अजिंक्‍य ओतारी, वृषभ ओतारी, गौरव बेलवलकर उपस्थित होते.

Web Title: sangli news krishna river