कृष्णेच्या प्रदूषणाविरोधात सामाजिक संघटनांचे आंदोलन

विजय पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सांगली - कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरोधात आता सामाजिक संघटना आंदोलनाला उतरल्या आहेत. कृष्णेच्या पाणी प्रदूषणावर आज मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन केले.

सांगली - कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरोधात आता सामाजिक संघटना आंदोलनाला उतरल्या आहेत. कृष्णेच्या पाणी प्रदूषणावर आज मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन केले.

महापालिकेवर दूषित पाण्याची कावड यात्रा काढण्यात आली. महापालिकेच्या गेटवर कृष्णेतील दूषित पाण्याने भरलेल्या बाटल्या लटकवण्यात आल्या. महापालिका उपायुक्तांनाही दूषित पाणी भेट देण्यात आले.

महापालिका प्रशासनाचा निषेध करीत सांगलीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कृष्णा नदीच्या दूषित पात्रपासून ते सांगली महापालिकेपर्यंत दूषित पाण्याची कावड यात्रा काढली. महापालिकेच्या इमारती समोर आक्रोश करण्यात आला.
महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून कृष्णेतील पाणी दूषित झाले आहे. याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे विजय जाधव यांनी लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी आंदोलक विजय जाधव यांनी आक्रोश करीत उपायुक्त सुनील पवार यांना दूषित पाण्याची बाटली भेट दिली.

यावेळी कृष्णा नदीच्या दूषित पाण्याबाबत लवकरच तोडगा निघेल अशी ग्वाही यावेळी उपायुक्तांनी दिली.

संबंधीत बातम्या

Web Title: Sangli News Krishna River Pollution issue