मित्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सांगली - किरकोळ वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून केल्या प्रकरणी सोहेल अब्बास मुल्ला यास  न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीवर्धन देसाई यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

सोहेल अब्बास मुल्ला (वय २३, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) आणि बबलू ऊर्फ स्वप्नील भोसले हे दोघे मित्र होते. बबलूचा मित्र रोहित वायदंडे याला आरोपी सोहेल मुल्ला काहीतरी बोलला होता. त्यावरून बबलू आणि सोहेल मुल्ला यांच्यात वाद झाला. तेथून त्यांच्यात तेढ निर्माण झाली.

त्यानंतर काही दिवसांनी बबलू ऊर्फ स्वप्नील भोसले, सोहेल मुल्ला व त्यांचे  इतर मित्र मिरजेतील सह्याद्रीनगर येथे मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी बबलू आणि मुल्ला यांच्यात बाचाबाची झाली. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी अमित बराते हा गेला. त्यावेळी सोहेल मुल्लाने खिशातून चाकू काढला आणि बबलूच्या पोटात भोसकले. बबलूला त्याच्या मित्रांनी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल केला. या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या 
साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायाधीश वर्धन देसाई यांनी साक्षी पुराव्यांच्या आधारे मुल्ला यास शिक्षा सुनावली.

Web Title: Sangli News life imprisonment in boyfriend murder case