बलात्कारातील दोषींच्या अटकेसाठी लोणार समाजाचे मुंडण आंदोलन

विजय पाटील
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सांगली - जिल्ह्यातील आटपाडी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराची घटना घडली होती. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आज लोणार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. 

आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या घटनेला एक महिना झाला. अद्याप ही आरोपींना अटक करण्यात आली नाही. मुलीला न्याय मिळावा, यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली. पण अजूनही तपासात काहीच हालचाल झाली नाही. यासाठी निषेध म्हणून आज लोणार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले.. तपासात टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचाही यावेळी आंदोलकांनी निषेध केला.
 
Web Title: Sangli News Lonar Samaj Mundan Agitation