मदनभाऊ महाकरंडक ‘खटारा’ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

सांगली -  यंदाच्या दुसऱ्या मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धेत अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचच्या ‘खटारा’ एकांकिकेस पहिले लाखाचे पारितोषिक मिळाले.

सांगली -  यंदाच्या दुसऱ्या मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धेत अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचच्या ‘खटारा’ एकांकिकेस पहिले लाखाचे पारितोषिक मिळाले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या  नेत्या जयश्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते, नगरसेवक राजेश नाईक, उपायुक्त सुनील पवार उपस्थित होते. स्पर्धेचे कार्याध्यक्ष व मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी यापुढे या स्पर्धा सत्तेत असू वा नसो नियमित होतील, अशी ग्वाही यावेळी दिली. 

गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेने नेते मदन पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीन दिवसांच्या या स्पर्धेत निमंत्रित नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला. मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ या एकांकिकेस दुसरा, तर कल्याणच्या अभिनय संस्थेच्या ‘दर्दपोरा’ या एकांकिकेस पंचवीस हजारांचे पारितोषक मिळाले. उत्तेजनार्थ दहा हजारांची बक्षिसे मराठवाडाच्या ‘नाट्यवाडा’ या संस्थेच्या ‘मॅट्रिक’ या आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘माणसं’ या एकांकिकेस मिळाली. नाट्यापंढरी सांगलीत मदनभाऊंच्या स्मृतीनिमित्त असा उपक्रम सुरू करून एक चांगला पायंडा पडल्याचे मत प्रमुख पाहुणे दिलीप पाटील यांनी व्यक्त केले. 

वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी अनुक्रमे असे, कंसात निकाल -
दिग्दर्शन- विनोद गरुड (खटारा), अभिजित झुंजारराव (दर्दपोरा), शवबा गजमल (माणसं), 
नेपथ्य- शुभम गाडे, प्रमोद कसबे (खटारा), सानिक (निर्वासित), अभिजित झुंजारराव (दर्दपोरा)
प्रकाश योजना- श्‍याम चव्हाण (दर्दपोरा), सूरज गाडगिळे (आफ्टर द डायरी), चेतन ढवळे (मॅट्रीक)
पार्श्‍वसंगीत- अक्षय घांगड (निर्वासित), चाणक्‍य तेंडुलकर, चैतन्य शेंभेकर (माझ्या छत्रीचा पाऊस),
नाट्यसंहिता- स्वप्नील जाधव (निर्वासित), प्रवीण पाटेकर (मॅट्रीक), चिन्मय देवर (सॉरी परांजपे), पुरुष अभिनय- साई मिरवाडकर (श्‍यामची आई), जगदीश जाधव (मॅट्रीक), विशाल चव्हाण, (कडमित्रे), स्त्री अभिनय -सायली बांदेकर (निर्वासित), मृणाल तांबडकर  (श्‍यामची आई), पारुल देशपांडे (तळ्यात मळ्यात)

Web Title: Sangli News Madanbhau Mahakarandak competition