मोदक, खीर बनवण्याची "मधुरांगण'तर्फे कार्यशाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सांगली - गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ मधुरांगण' ने विविध प्रकारचे मोदक आणि खीर तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. बुधवारी (ता.23) राम मंदिर चौकातील सकाळ कार्यालयाच्यावरील सभागृहात दुपारी साडेतीन वाजता पाककृती तज्ज्ञ शीला पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मधुरांगण सभासदांसाठी होणाऱ्या कार्यशाळेत मैत्रिणींना एकत्रित रेसीपीच्या माहितीचा खजाना पहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

"मधुरांगण' सभासदांसाठी कार्यशाळा निशुल्क आहे. यात रेसिपीमध्ये शीला पाटील आपला अनुभव "मधुरांगण'च्या मैत्रिणांना सांगणार आहेत. कार्यशाळेला येताना सभासदांनी नोंदीसाठी वही, पेन, पाण्याची बाटली असे साहित्य घेऊन यायचे आहे. 

गणेशोत्सवात मोदक आणि खीर या दोन्ही प्रदार्थांना मोठे महत्त्व असते. उत्सवातील दर दिवशी आरतीवेळी प्रसाद म्हणून मोदकांचे वाटप होते. महाप्रसाद म्हणून बहुतांश मंडळाकडून खिरीची निवड केली जाते. मोदक आणि खीर अधिक रुचकर होण्यासाठी कोणकोणते मसाल्याचे पदार्थ वापरावेत, सुका मेवा कोणता आणि किती प्रमाणात घ्यावा याबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी मैत्रिणी आतूर आहेत. चविष्ट उकडीचे मोदक बनवता यावेत, यासाठी उकड कशी करावी, गॅसवर व मायक्रोओव्हनमध्ये मोदक कसे बनवावेत या कृती शिकवल्या जाणार आहेत. मार्गदर्शन, रेसीपी शिकण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मैत्रिणींनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी प्रियांका साळुंखे (9850967696) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sangli news madhurangan