तब्बल 47 लाख रुपये किंमतीचा मांडूळ सर्प मिरज पोलिसांकडून जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मिरज - औषधी कामासाठी व काळी जादू करण्यासाठी तस्करी केल्या जाणारे मांडूळ मिरज पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत तब्बल 47 लाख रुपये असल्याची माहीती उपनिरिक्षक गोसावी यांनी दिली.

मिरज - औषधी कामासाठी व काळी जादू करण्यासाठी तस्करी केल्या जाणारे मांडूळ मिरज पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत तब्बल 47 लाख रुपये असल्याची माहीती उपनिरिक्षक गोसावी यांनी दिली.

याप्रकरणी हुसेन तांबोळी आणि लतिफ जमादार ( दोघेही रा. सांगली ) यांना अटक केली आहे. गुरूवारी (ता. 1) रात्री तालुक्यातील खंडेराजुरी येथे ही कारवाई करण्यात आली. खंडेराजुरीतील विक्रम कांबळे याच्याकडून मांडूळ घेतला असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. मांडुळाची विक्री करण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचला. संशयितांकडे एका प्लास्टीक पोत्यामध्ये पुर्ण वाढ झालेला मांडूळ सर्प आढळला. 

Web Title: Sangli News Madul snake seized by Miraj police

टॅग्स