सांगलीत महावितरण, अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांकडून बगळ्याला जीवदान

विजय पाटील
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

सांगली - अहिल्यानगरमध्ये आज सकाळी वीजेच्या पोलवर बगळा अडकला. या अडकलेल्या बगळाची महावितरण व अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच सुटका करत बगळ्याला जीवदान दिले.

सांगली - अहिल्यानगरमध्ये आज सकाळी वीजेच्या पोलवर बगळा अडकला. या अडकलेल्या बगळाची महावितरण व अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच सुटका करत बगळ्याला जीवदान दिले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगलीच्या अहिल्यानगर मध्ये आज सकाळी  वीजेच्या खांबावर बगळा अडकलेला दिसला.  नागरिकांनी ही माहीती तातडीने अॅनिमल राहत आणि अग्निशामक विभागास दिली. तसेच महावितरण विभागासही या संदर्भात संपर्क साधला. तातडीने या सर्व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विद्युत तारांमध्ये अडकलेल्या बगळ्याची सुटका केली. या खांबावरून बगळ्याची सुटका केल्यानंतर त्याने आकाशात पुन्हा उंच भरारी मारली व दूर निघून गेला. 

Web Title: Sangli News Mahavitaran employee escape Egret