‘मैत्रेय’चा ट्रॅप 20 कोटींचा

बलराज पवार
बुधवार, 16 मे 2018

सांगली - मैत्रेय गुंतवणूक कंपनीत जिल्ह्यातील सुमारे १३ हजारहून अधिक गुंतवणूकदारांची २० कोटींहून अधिक रक्कम अडकल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या विभागाकडून गुंतवणूकदारांची जिल्हाभरातील माहिती गोळा करण्यात येत असून हा आकडा आणखी मोठा  असू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्‍चर्स कंपनीत पैसे गुंतवलेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून माहिती घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत या शाखेकडे १३ हजारहून अधिक गुंतवणूकदारांचे अर्ज आले असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी दिली. अजून गुंतवणूकदारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू असून गुंतवणूकदारांची संख्या २० ते २५ हजारपर्यंत जाण्याची शक्‍यता असून ४० कोटी रुपये इतकी गुंतवणूक अडकली आहे. 

गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर कंपनीने दिलेले धनादेश वटले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे जबाब नोंदवले आहेत. कंपनीने २०२३ पर्यंतच्या मुदतीसाठी गुंतवणूक स्वीकारली आहे. गुंतवणूकदारांना जमीन, प्लॉट किंवा फ्लॅट देण्याचे किंवा आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

सेबीचे निर्बंध 
भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था ‘सेबी’ने भूखंड देण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या गुंतवणुकीस बेकायदा ठरवले आहे. त्यामुळे कंपनीवर कोणत्याही योजनेंतर्गत लोकांकडून निधी उभारणे आणि  कंपनीच्या विद्यमान संपत्ती व मालमत्ता, गुंतवणूकदारांचा पैसा अन्यत्र वापरण्यावर सेबीने निर्बंध घातले आहेत. सध्या देशभरातील मालमत्तांचा शासनाने ताबा घेतला आहे. गुंतवणूकदाराचे पैसे परत देण्यासाठी कंपनी व पोलिस यांचे संयुक्त खाते ‘एस्क्रो’ खाते उघडण्यात आले आहे. कंपनीकडे स्थावर व जंगम मालमत्ता असून त्याच्या विक्रीतून येणारी रक्कम या खात्यात जमा होते. त्यातूनच गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया होते. महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (एमपीआयडी) न्यायालयांतर्गत या घोटाळ्याची सध्या चौकशी व कारवाई सुरू आहे.

Web Title: Sangli News Maitraya Investment company trap 20 cores