मुंबई मोर्चा सरकारला शेवटची संधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत 9 ऑगस्टला क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील मोर्चा राज्य सरकारला शेवटची संधी असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक ए. डी. पाटील व डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

मुंबईतील मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवारी सांगलीत कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आरक्षणासाठी राज्यभर लाखोंच्या उपस्थितीत मूक मोर्चे काढले. मोर्चानंतर वातावरण शांत झाले. समाज शांत राहणार नाही. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकालात काढण्याच्या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आरक्षणाबाबत विनंती करण्यात आली आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारकडून चालढकल केली जात आहे. क्रांती मोर्चानंतर सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्टला मुंबईत क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा हा सरकारसाठी शेवटची संधी असेल, असा इशारा मोर्चाद्वारे दिला जाईल. या मोर्चाबाबत 18 जूनला नाशिकला बैठक झाली. त्यामध्ये जिल्हानिहाय नियोजन करावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

जिल्हास्तरीय बैठकीनंतर प्रत्येक तालुक्‍यांत नियोजनासाठी बैठक होईल. मुंबईतील मोर्चाला जिल्ह्यातून सुमारे दोन लाख समाजबांधव जातील. प्रत्येक गावांतील दोनशे लोकांचा समावेश असेल, असा अंदाजही श्री. पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरंग पाटील, काका हलवाई, विजय भोसले, संदीप कदम उपस्थित होते. 

नियोजनासाठी शनिवारी बैठक 
मुंबईतील मोर्चाबाबत जिल्ह्याचे नियोजन करण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता सांगलीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. मार्केट यार्डातील वारणा मंगल कार्यालयातील बैठक होईल, जिल्ह्यात क्रांती मोर्चा शांतपणे पार पाडला. त्याप्रमाणे मुंबईतील मोर्चाला कोणतेही गालबोट न लागता तो यशस्वी होण्याबाबतचे नियोजन केले जात आहे. मराठा सेवा संघ, महासंघ, सोशल ग्रुप, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह सर्व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावले आहे. 

Web Title: sangli news maratha kranti morcha