झेंडू उत्पादकांची अडतीच्या नावाखाली लूट 

नागेश गायकवाड
गुरुवार, 5 जुलै 2018

आटपाडी - राज्य सरकारने शेतकऱ्याकडून अडत वसूलीला बंदी घातलेली असतानाही मुंबईतील दादर येथील बाजार समितीत दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील झेंडू उत्पादकाकडून तब्बल पंधरा टक्के अडतीच्या नावाखाली राजरोस लूट सूरू आहे. शेतकऱ्याचा खिसाच कापला जात आहे. 

राज्य सरकारने बाजार समितीमधील अडत रद्द केली आहे. असे असताना दादर येथील बाजार समितीत अडतदार शेतकऱ्यांकडून पंधरा टक्के आडत घेत आहेत.

दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील हिवतड येथून रोज पाच गाडया भरून झेंडू पाठवला जातो. गावात घराघरात झेंडू पिक घेतले जाते. उत्पादनात गावकऱ्यांनी हातखंडाच मिळवला आहे. रोज  सरासरी पाच टन माल पाठविण्यात येतो. सुमारे दिड ते दोन लाखाचा झेंडू गेली चारवर्षे पाठविण्यात येत आहे. पण या झेंडूवर अडत वसूल केली जाते.

दादर बाजार समितीत बेकायदेशीरपणे पंधरा टक्के अडत झेंडूवर वसूल केली जाते.  
- उमाजी सरगर
(शेतकरी) 

एक दृष्टिक्षेप 
हिवतड झेंडू लागवडीचे क्षेत्र - 700 एकर. 
शेतकरी संख्या - 400. 
रोज जाणारा माल - 4 गाडया.

एका गाडीत पेटया - 700.

एका पेटीत माल - 13 किलो. 
सरासरी  - 25 ते 40 रूपये.

जाणारा माल - 5 टन.

आडत - 15 टक्के 

Web Title: Sangli News Marigold growers issue