दरमहा हक्काचे साडेदहा कोटी शेतकऱ्यांच्या हाती 

दरमहा हक्काचे साडेदहा कोटी शेतकऱ्यांच्या हाती 

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने गायीचे दूध किमान 25 रुपये लिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना दूध संघांना दिल्या आहेत. त्याची चोख अंमलबजावणी झाली तर जिल्ह्यातील सुमारे सात लाख लिटर दूधाला त्याचा फायदा होईल. त्यातून सध्याच्या दूध खरेदी दरापेक्षा रोज सरासरी 35 लाख रुपये तर महिन्याकाठी सुमारे साडेदहा कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काने जास्तीचे मिळणार आहेत. 

जिल्ह्यात बावीस सहकारी संघांकडे संकलित होणारे गायीचे दूध सरासरी 4 लाख 33 हजार लिटर आहे. खासगी बारा संघांकडील गाय व म्हैस दुधाची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नसली तरी एकूण दुधापैकी सुमारे साडेतीन लाख लिटर दूध गायीचे आहे. ही एकत्रित आकडेवारी सात लाख लिटर होते. त्याला सरासरी पाच रुपये जास्तीचे मिळतील, असे गृहित धरले तर महिन्याला 35 लाख तर वर्षाकाठी साडेदहा कोटी रुपय हक्काचे जादा हाती येणार आहेत. 

गाय दुधाचा आधाची खरेदी दर 24 रुपये होता. राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी त्यात तीन रुपयांची वाढ जाहीर केली. तो दर 27 रुपये प्रतिलिटर झाला, मात्र खासगी आणि सहकारी संघांनीही त्या दराने खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली. अतिरिक्त दूधाचे कारण सांगत काही संघांना थेट 17 रुपये लिटरपर्यंत दर पाडला. काही संघांनी 20 रुपये, 21 रुपयांनी खरेदी केली. हा प्रश्‍न किचकट होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभर दूध बंद आंदोलन पुकारले. तीन दिवस कडकडीत आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने दूध खरेदीचा किमान आणि समान दर 25 रुपये लिटर जाहीर केला आहे. 31 जुलैपासून या दराने गाय दूध खरेदी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

आता शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत अटी आणि नियम घालण्यात आले आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे येताना त्याचा थेट परिणाम संभवणार नाही, याची काळजी सरकारलाच घ्यावी लागणार आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना सध्याच्या दरापेक्षा किमान लिटरमागे सरासरी पाच रुपये जास्त मिळतील, अशी आशा आहे. 

सहकारी संघांचे गाय दूध संकलन (लिटर) 

* वसंतदादा संघ ः 24,500 
* राजारामबापू संघ ः 1,22,117 
* फत्तेसिंहराव नाईक संघ ः 28,500 
* मोहिनराव शिंदे संघ ः 19,200 
* हणमंतराव पाटील, विटा ः 3200 
* शेतकरी, कवठेमहांकाळ ः 11,439 
* सोनहिरा संघ ः 1400 
* नानासाहेब सगरे संघ ः 2000 
* संपतराव देशमुख संघ ः 30,500 
* हुतात्मा संघ ः 28,988 
* क्रांती संघ ः 19,400 
* साई अमृत ः 13,500 
* यशोधरा ः 460 
* साई गणेश ः 16,300 
* यशवंत मल्टीस्टेट ः 63,031 
* बालाजी संघ ः 3600 
* व्यंकटेश्‍वरा ः 1550 
* बाबासाहेब देशमुख संघ ः 27,500 
* अग्रणी मांजर्डे ः 2600 
* शेतीमाल दुधोंडी ः 4436 
* योगेश्‍वर ताकारी ः 3900 
* वाळवा, शिराळा, इस्लामपूर संघ ः 3040 

खासगी संघांचे दूध संकलन (एकत्र गाय-म्हैस) 
* चितळे डेअरी ः 5,94,600 
* जतना डेअरी ः 9900 
* सिद्धिविनायक ः 9000 
* शेतकरी इस्लामपूर ः 8700 
* पाटील माळवाडी ः 10,000 
* थोटे डेअरी ः 20,220 
* नागोरे डेअरी ः 15,500 
* विटा डेअरी ः 19,700 
* देवल डेअरी ः 2880 
* बाफणा डेअरी ः 1385 
* प्रतीक्षा डेअरी ः 550 

असा असेल दर (8.3 एसएनएफ) -

प्रतिलिटर स्निग्धांशनुसार - 3.2 - 26.10 रुपये; 3.3 - 26.40; 3.4 - 26.70; 3.5 - 27; 3.6 - 27.30; 3.7 - 27.60; 3.8 - 27.90; 3.9 - 28.20; 4.0 - 28.50; 4.1 - 28.80; 4.2 - 29.10; 4.3 - 29.40; 4.5 - 30 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com