दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तहसीलसमोर बेमुदत उपोषण

नागेश गायकवाड
बुधवार, 2 मे 2018

आटपाडी  - दूध दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.​

आटपाडी  - दूध दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.

दूध, धान्य आणि भाजीपाल्याचे दर कोसळत चालले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोज वाढत आहेत तर दुधाचे भाव कोसळत चालला आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. दुध उत्पादकांची अवस्था वाईट झाली आहे. यामुळे दूध दरवाढीसह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. याची शहराध्यक्ष प्रशांत गवळी, मल्हारी बुधावले, अतुल जावीर, संभाजी हाके, ऋषिकेश गुरव, समाधान नळ, जनाधर्न माने, राजकुमार पडळे, अमित एवळे, अतुल यादव, विलास मोरे, सचिन मेनकुदळे, अनिल माने आदींनी सहभाग घेतला आहे.  

उपोषणकर्त्यांच्या मागण्या -

  • गाई दुधाला 3.5 फॅट व एसएनएफ दुधाला 35 रुपये दर द्यावा.  शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये थेट अनुदान द्यावे.
  • पशुपालन व्यवसायासाठी कमी व्याजदरात कजॅ आणि सबसीडी द्यावी.    
  • पशुखाद्याचे भाव कमी करावेत.
  • पशु वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.               

पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चाललेत तर दुधाचा भाव कमी होत आहे. बाटलीबंद पाण्यापेक्षाही दुधाचे दर कमी झाले आहेत. हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. म्हणुन आम्ही उपोषण सुरु केले आहे.

- प्रशांत गवळी, दिघंची शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Sangli News Milk rate issue in Atapadi