एमआयएम सांगली महापालिकेत चाळीस जागा लढवणार

संतोष भिसे
बुधवार, 20 जून 2018

मिरज - महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष पस्तीस ते चाळीस जागा लढवणार आहे. त्यासाठी बसप आणि भारिप या पक्षांशी आघाडीबाबत चर्चा सुरु असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे उपस्थित होते. 

मिरज - महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष पस्तीस ते चाळीस जागा लढवणार आहे. त्यासाठी बसप आणि भारिप या पक्षांशी आघाडीबाबत चर्चा सुरु असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे उपस्थित होते. 

ते म्हणाले, नागरीकांच्या मुलभूत सुविधा हा आमचा प्रमुख अजेंडा असेल. महापालिका स्थापनेच्या वीस वर्षांनंतरही आपण रस्ते, गटारी याच सुविधांविषयी जर बोलत असू तर ते सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. त्यांना समर्थ पर्याय म्हणून एमआयएम आघाडी पुढे आली आहे. आघाडीचे चिन्ह कोणते असावे या मुद्यावर चर्चा थांबली आहे.

पक्षाकडून निवडणुक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. किमान चाळीस जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, नऊ, पंधरा, सोळा, अठरा, एकोणीस व वीसमध्ये आम्ही रिंगणात उतरु. प्रभाग क्रमांक पाच, सहा, पंधरा व सोळा येथेही विशेष लक्ष असेल. या सर्व प्रभागांत आमचे पॅनेल असेल. सुशिक्षित आणि तरुण इच्छुकांना तिकिेटे दिली जातील. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या सांगली व मिरजेत किमान दोन जाहीर सभा घेणार आहोत. शिवाय आमदार वारीस पठाण, अकबरुद्दीन ओवेसी हे दोघेही निवडणुक संपेपर्यंत तळ ठोकून असतील. 

विकासाची अपेक्षा करणारा प्रत्येक नागरीक समर्थक

ते म्हणाले, एमआयएम हा पक्ष जातीयवादी आणि आक्रमक ही प्रतिमा हेतुपुरस्पर्‌ रंगवली गेली आहे. एमआयएममुळे भाजपचा फायदा होतो ही टिकाही अनाठायी आहे. जातीयवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना पर्याय म्हणून एमआयएमचा उदय झाला आहे. आमचे राजकारण विकासाचे असेल. फक्त मुस्लिम किंवा दलित हेच आमचे समर्थक नाहीत; तर विकासाची अपेक्षा करणारा प्रत्येक नागरीक समर्थक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात असून त्यांचा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम लवकरच होईल. पक्षनिरिक्षक पुढील आठवड्यात सांगली-मिरजेच्या दौऱ्यावर येणार आहेत; त्यावेळी इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होईल. 

बैठकीला शहराध्यक्ष सैद सौदागर, इम्रान जमादार, शाहीद पीरजादे, इम्रान ढालाईत आदी उपस्थित होते. 

Web Title: Sangli News MIM in Sangli Palika election