कामगार कायद्यातील बदलाबाबत लवकरच पुर्नविचार - संभाजीराव पाटील-निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

इस्लामपूर - कामगार कायद्यातील बदलाबाबत लवकरच पुर्नविचार केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दिले.

इस्लामपूर - कामगार कायद्यातील बदलाबाबत लवकरच पुर्नविचार केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दिले.

भारतीय मजदुर संघातर्फे असंघटित कामगार महामंडळाबाबत निर्णय घेणे, कंत्राटी कामगार, घरेलु कामगार, सुरक्षा रक्षक , माथाडी कामगार व बांधकाम कामगार यांच्या समस्याबाबतचे निवेदन देण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात याबाबत बैठक झाली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय करु असे अश्वासन कामगार मंत्री पाटील-निलंगेकर यांनी भारतीय मजदुर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णाजी धुमाळ यांच्या शिष्टमंडळाला दिले. कामगार विभाग प्रधान सचिव राजेश कुमार व कामगार आयुक्त श्री. पोयाम हे उपस्थित होते. कामगार कायद्यातील बदलाबाबत पुर्नविचार, असंघटित कामगार महामंडळाबाबत निर्णय, कंत्राटी कामगार, घरेलु कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार व बांधकाम कामगार यांच्या समस्याबाबत चर्चा झाली.

या शिष्टमंडळात प्रदेशचे महामंत्री रविंद्र देशपांडे, संघटनमंत्री रविंद्र पुरोहित, मुबंईचे सरचिटणीस अॅड. अनिल ढुमणे, विजयराव मोगल (नाशिक), शोभाताई अंबरकर (ठाणे), वेदाताई आगटे (पुणे), श्रीपाद कुटास्कार (अौरंगाबाद), गजानन पाटील (सांगली) उपस्थित होते.

Web Title: Sangli News minister Sambhajirao Patil comment