प्रगतीसाठी आयुष्यात सकारात्मक अन् आशावादी राहा - मीरा बोरवणकर

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 9 मार्च 2018

इस्लामपूर - आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहाल तरच प्रगती कराल, असे प्रतिपादन राज्याच्या माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी आज येथे केले. त्यांच्या सेवाकालात व  कारकिर्दीत आलेले बरेवाईट अनुभव व त्यापासून तरुण-तरुणी आणि महिलांनी कोणते कृतिशील धडे घ्यावेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

विश्वकर्मा पब्लिकेशन आणि युनिक अॅकॅडमीच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी तरूणांशी मुक्त संवाद साधला. पोलीस उपअधीक्षक डॉ. किशोर काळे, विशाल सोनी, अमर जगताप, दिग्विजय पाटील प्रमुख उपस्थित होते.

अभ्यासाचे नाटक करू नका. चांगले वाचा. वृत्तपत्रांतील संपादकीय लेख वाचा. स्वतःचे ठाम मत बनवा आणि ते ठामपणे मांडा. प्रामाणिकपणे योगदान दिल्यास करियर कोणतेही असो, आपण त्यात यशस्वी व्हाल. मुली पोलीस खात्यात येणार असतील तर त्यांनी उघड्या डोळ्यांनी यावे. वास्तव समजून घेऊन काम करण्याच्या तयारीने उतरावे.

-  डॉ. मीरा बोरवणकर

डॉ. बोरवणकर म्हणाल्या, "फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विशिष्ट तयारीची आवश्यकता असते. मानसिक सतर्कता आणि निरीक्षण चांगले ठेवा. भावनिक संतुलन राखले पाहिजे. त्यासाठी चांगली संगत शोधा. सकारात्मक विचार ठेवून स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण आशावादी असू तरच आपली प्रगती होते. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. कठोर प्रयत्नांना कोणताही पर्याय नसतो. त्यावर लक्ष केंद्रित करा.` 

संतोष पाटील यांनी आभार मानले. 

Web Title: Sangli News Mira Borvankar comment