भाजपचा नारा ‘सब का नाश’ - आमदार नसीम खान

भाजपचा नारा ‘सब का नाश’ - आमदार नसीम खान

सांगली - सब का साथ, सब का विकास ही घोषणा गुंडाळून भाजपने सब का सत्यानाश अशी घोषणा अमलात आणली आहे. सांगलीतून देशभर भाजप  मुक्तीला सुरुवात होणार आहे. केंद्र आणि राज्यातील अल्पसंख्याकांच्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या. मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने नाराजी आहे. त्यांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, असा इशारा माजी मंत्री आमदार नसीम खान यांनी येथे दिला. 

महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर आमदार खान यांनी विविध प्रभागात मतदारांच्या भेटी घेतल्या. काही ठिकाणी बैठका झाल्या. त्यांच्यासोबत  काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, करिम मेस्त्री, तौफिक मुलाणी उपस्थित होते. 

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘‘या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या चार वर्षांत भाजपची विजयाची चढती कमान नांदेड महापालिका निवडणुकीत खंडित झाली. त्यानंतर पोटनिवडणुकात भाजपला पराभव झाला. कर्नाटकात फसले. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी येथे निवडणूक होत आहे. सांगलीतून देशातील भाजप  मुक्तीला सुरवात होणार आहे. भाजपला आघाडी धूळ चारेल. भाजपमुक्तीची सुरवात खऱ्या अर्थाने सांगलीतून होईल. तसे सांगलीत सध्या वातावरणही आहे.’’

ते म्हणाले,‘‘भाजपने २०१४ मध्ये सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केली. आता ती ‘सबका साथ, सबका सत्यानाश’ पर्यंत पोहोचलीय. राज्यात, देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात मराठा, मुस्लिम समाजाचे आरक्षण टिकवता आले नाही. धनगरांना आरक्षणाचे गाजर दाखवले. तिन्ही समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. आरक्षणाला स्थगितीनंतरही मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाचे काय झाले?, अशी विचारणा केली तरी सरकारने प्रतिसाद दिला नाही. त्याची मुस्लिम समाजात मोठी नाराजी आहे. त्यांचा उद्रेक होऊ शकतो.’’

लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचा विकास केला का? 
आमदार नसीम खान म्हणाले,‘‘जिल्ह्यात भाजपचा खासदार, आमदारांची मांदियाळी आहे. सांगली, मिरजेतील दोन आमदारांनी विकासासाठी काय केले हे मतदार मतपेटीतूनच सांगतील. येथेही भाजपचे कार्यकर्ते खोटं पण रेटून बोलताहेत. येथे आघाडी दोनतृतीयांश टक्केने सत्तेत येणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com