आमदार सुमन पाटील यांचे 12 पासून पाण्यासाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

तासगाव - येरळा नदीत आरफळ, ताकारीचे पाणी सोडावे म्हणून मागणी करूनही दाद मिळत नसल्याने आमदार सुमन पाटील यांनी १२ मे पासून निमणी येथे येरळा पात्रात उपोषणाचा निर्णय जाहीर केला. त्यांनी वाझर बंधाऱ्यापर्यंत जाऊन पाणी सोडल्याची पाहणी केली.

तासगाव - येरळा नदीत आरफळ, ताकारीचे पाणी सोडावे म्हणून मागणी करूनही दाद मिळत नसल्याने आमदार सुमन पाटील यांनी १२ मे पासून निमणी येथे येरळा पात्रात उपोषणाचा निर्णय जाहीर केला. त्यांनी वाझर बंधाऱ्यापर्यंत जाऊन पाणी सोडल्याची पाहणी केली.

दोन महिन्यांपासून येरळाकाठचे शेतकरी ताकारी, आरफळ योजनांचे पाणी सोडावे म्हणून अर्ज विनंत्या करीत होते. अधिकारी दाद देत नव्हते. पाणी सोडले असल्याचे खोटे सांगत होते. त्यामुळे आमदार पाटील यांनी १२ मे पासून उपोषणावर ठाम आहेत, असे  सांगितले. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर काल पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वाझर बंधाऱ्यात पाणी आल्याचे सांगितले. आज आमदार पाटील यांनी वाझर बंधाऱ्यावर जाऊन पाणी सोडले की नाही, याची पाहणी केली. 

पाटबंधारेच्या उपअभियंता सौ. योगिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तासगाव पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पाटील, निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप  पाटील, जनार्दन पाटील, बाळासाहेब गुरव, बाळासाहेब कोळेकर, सदाशिव खरात उपस्थित होते.

पाणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र पाणी नसल्याने संतप्त आमदार पाटील यांनी तेथूनच कार्यकारी अभियंता एच. व्ही. गुणाले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अधिकारी खोटी माहिती देत आहेत, असे निदर्शनास आणून दिले. पाणी निमणी बंधाऱ्यापर्यंत येईपर्यंत १२ मे पासून निमणी यथे येरळेच्या पात्रात बेमुदत उपोषणाचा निर्णयही त्यांनी घेतला. 

दोन महिने पाण्याची मागणी
येरळेत पाणी नसल्याने नदीकाठावर भीषण टंचाई निर्माण झाली. दोन महिने शेतकरी पाण्याची मागणी करीत आहेत. अधिकारी पाणी सोडले सांगून वेळ मारून नेत आहेत. आता उपोषणामुळे पाणी मिळते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

Web Title: Sangli News MLA Suman Patil agitation for water