मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही - आमदार विश्वजित कदम

विजय पाटील
रविवार, 29 जुलै 2018

सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे.

सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने मुख्यमंत्र्यांना दौर रद्द करण्याची नामुष्की आली आहे, अशी टीकाही कदम यांनी केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणूक प्रचार दौरा रद्द यावरून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी आज भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

मराठा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. संपूर्ण समाजात असंतोष पसरला आहे आणि त्याचा उद्रेक होत आहे. मात्र गेल्या साडे तीन वर्षात भाजप सरकारने ठोस भुमिका घेतली नाही .त्यामुळे हे सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. आरक्षण देण्याची या सरकारची मानसिकता नाही,.

- विश्वजित कदम, आमदार

श्री. कदम म्हणाले, सांगली महापालिकेच्या निवडणूकीत भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीमध्ये येणार होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. मराठा समाजाच्या असंतोषामुळेच हे झाले आहे.  मुख्यमंत्र्यांना सांगलीत यायला कोणाची भीती वाटत आहे  हे त्यांनी सांगावे.

निवडणूकीसाठी मुख्यमंत्र्याना सोशल मीडियावरून प्रचार करण्याची वेळ आली आहे,  हे हास्यास्पद आहे असा टोलाही यावेळी श्री. कदम यांनी लगावला आहे.

Web Title: Sangli News MLA Vishwajeet Kadam comment