अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सांगली - एसटी प्रवासात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने आज सुनावली. भाऊसाहेब आकाराम मोहिते (वय ५५, रा. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटणेकर यांनी बाल लैंगिक अत्याचार  प्रतिबंधक कायद्यांतर्गत निकाल दिला. सरकारतर्फे ॲड. अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले.

२४ मार्च २०१३ मध्ये सायंकाळी साडे सहा  वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आई- वडिलांसह औरंगाबाद- सांगली बसने सांगलीला येण्यासाठी तासगावातून निघाली. मुलीचे आई-वडील आणि लहान बहीण एका सीटवर तर पीडित मुलगी एका सीटवर बसली होती. तिच्या शेजारी भाऊसाहेब मोहिते बसला होता. त्याने या वेळी मुलीचा विनयभंग केला. मुलगी घाबरून ओरडली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तासगाव पोलिस ठाण्यात मोहिते याच्याविरोधात तक्रार दिली.

या प्रकरणी हवालदार बी. डी. भोर यांनी तपास केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सापटणेकर यांनी साक्षी, पुरावे यांच्या आधारे मोहिते याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Sangli News Molestation of minor girl incidence