अन्‌ त्या माकडाच्या पिलाला मिळाले मातृत्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मिरज - मातेपासून दुरावलेल्या माकडाच्या महिन्याभराच्या पिलाचे मातृत्व मिरजेतील लकडे कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. गेल्या महिन्याभरापासून त्या पिलाचे संगोपन केले जात आहे. पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेत सव्वा महिन्यांपासून अन्य प्राण्यांच्या समवेत ते बागडताना पाहून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.

कागवाड येथे एका अपघातात या वानराच्या मातेचा मृत्यू झाला. वाहनाच्या धडकेतून पिल्लू बचावले. नागरिकांनी त्याला कागवाड वन विभागाकडे सुपूर्द केले. वन विभागाने त्याला पीपल्स फॉर ॲनिमल्सच्या ताब्यात  दिले. इवल्याशा पिलाला जगवण्यासाठी लकडे  कुटुंबीयांनी प्रयत्न केले. बाटलीने दूध पिण्याची सवय लावली आहे. लकडे कुटुंबीय प्राणी क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी या पिलाचे संगोपन केले आहे. 

आमच्या कुटुंबाला प्राणिप्रेम आहे. जखमी प्राण्यांवर गेल्या काही वर्षांपासून उपचारही केले जातात. या माकडाच्या पिलाचेही आता संगोपन करतो आहे.
- शुभांगी लकडे

Web Title: Sangli News Monkey special story