पडवळवाडीत मातेची मुलीसह विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

आष्टा - मानसिक व फिट्‌सच्या आजाराला कंटाळून आईने सात वर्षांच्या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बचावकार्यात आई बचावली; मात्र यात सात वर्षांच्या मुलगीचा मृत्यू झाला. घटनेने पडवळवाडीवर शोककळा पसरली. घटनेची आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

आष्टा - मानसिक व फिट्‌सच्या आजाराला कंटाळून आईने सात वर्षांच्या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बचावकार्यात आई बचावली; मात्र यात सात वर्षांच्या मुलगीचा मृत्यू झाला. घटनेने पडवळवाडीवर शोककळा पसरली. घटनेची आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

अबोली अंकुश शिंदे व अरुंधती अंकुश मदने (वय ७, रा. मूळगाव कोकळे, सध्या पडवळवाडी) अशी त्या माय-लेकींची नावे आहेत. अबोली या मनोरुग्ण आहेत. त्यांना वारंवार फिट येते. २०११ ला त्यांचा अंकुश यांच्याशी विवाह झाला होता. फिट आजाराबाबतची माहिती अंकुश याना दिली होती. अबोली यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. अंकुश हे कामानिमित्त पुणे येथे राहतात. अबोली मुलगी अरुंधतीसह 
औषधोपचारासाठी आईवडील यांच्याकडे पडवळवाडी येथे राहत होत्या. यापूर्वी त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केले होते. 

शनिवारी रात्री हरिपाठ असल्याने आजी-आजोबा अरुंधतीला घेऊन मंदिरात गेले होते. या वेळी अबोली मंदिरात आली. अरुंधतीला वरात दाखवायला घेऊन जाते असे सांगून अबोली गडबडीने गेली. हरिपाठ संपल्यानंतर तिचे आईवडील घरी गेले असता ती घरी दिसली नाही. शोधाशोध केली असता मिळून आली नाही. नंतर शेतात ओढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या शरद खोत यांच्या विहिरीत अबोली तडफडताना दिसली. बाजीराव जाधव, सचिन उगळे यांनी अबोलीला पाण्याबाहेर काढले. अरुंधती पाण्यात असल्याचे अबोलीने सांगताच लोकांनी विहिरीत शोध घेतला असता अरुंधती मिळून आली नाही. पाणी उपसण्यास सुरवात केली. पाणी कमी झाल्यानंतर रविवारी सकाळी अरुंधतीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांचे पथक दाखल झाले.

Web Title: Sangli News mother suicide incidence in Padvalwadi