गुहागर-विजापूर महामार्गावर मोटारीस आग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कडेगाव - येथे गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ताकारी कॅनॉलनजीक एका मोटारीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात मोटारीचे सुमारे 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले

कडेगाव - येथे गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ताकारी कॅनॉलनजीक एका मोटारीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात मोटारीचे सुमारे 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. मोटारमालक बालाजी सुरेशबाबू त्रिवेंद्रीया (वय-35,रा. गोरेगाव,मुंबई) यांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवित हानी व कोणीही जखमी झाले नाही. याबाबत कडेगाव पोलीसांत नोंद झाली आहे. 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बालाजी त्रिवेंद्रीया हे मोटारीमधून (एम. एच. 47. एम. 6010) नांदोशी (ता. खटाव, जि. सातारा) येथील मित्रांकडे आले होते. त्यावेळी त्यांचेसोबत दत्तात्रय कदम (रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) हेही होते. नांदोशी येथून ते मोटारीमधून मित्र दत्तात्रय कदम यांचेसोबत वडियेरायबागला त्यांचे गावी निघाले होते. ते गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कडेपूर गावच्या हद्दीत ताकारी कॅनॉलजवळ आले असता शॉर्टसर्किट झाल्याने इंजिनमधून धूर येवू लागला. त्यामुळे त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला घेतली. काही वेळातच संपुर्ण मोटार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. 

Web Title: sangli news motor burnt due to short circuit