एस.टी. महामंडळ घेणार 1 हजार खासगी सुरक्षारक्षक 

शिवाजी यादव
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर - एस.टी. महामंडळाच्या राज्यभरातील प्रमुख बस स्थानकावरून एस.टी.चे प्रवासी खेचण्यासाठी खासगी वाहतूकदारांकडून प्रयत्न होतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून मान्यताप्राप्त सुरक्षा संस्थेचे एक हजार सुरक्षारक्षक घेण्यात येणार आहेत. त्यांच्या नियुक्‍त्या राज्यातील महत्त्वाच्या बस स्थानकांवर करण्यात येणार आहेत. यात माजी सैनिकांचा समावेश असल्याने एस.टी. बस स्थानकांची सुरक्षा वाढणार आहे. तसेच तीन आसनी रिक्षांनाही बस स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. 

राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांतून खासगी प्रवासी वाहतूक होते. त्यासाठी काही खासगी वाहतूकदारांचे एजंट थेट एस.टी. बस स्थानकात येतात. येथे थांबलेल्या प्रवाशांना बोलावून खासगी बसने प्रवासासाठी घेऊन जातात. काही वेळा बस स्थानकांवरील अधिकाऱ्यांनी अशा एजंटांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास वादावादी होते; तर काही वेळा अधिकारी कामात गुंग असल्याचे पाहून एजंटांकडून प्रवासी खेचण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या गाड्या रिकाम्या आणि खासगी गाड्यांना गर्दी, असा विरोधाभास अनेक बस स्थानकांबाहेर पाहायला मिळतो. सध्या बस स्थानकांवर एक किंवा दोन सुरक्षारक्षकांची नियुक्ती असते. यामुळे बस स्थानकावरील गैरप्रकार एस.टी.चे सुरक्षा कर्मचारी थांबवू शकत नाहीत. याची दखल घेत महामंडळाने बस स्थानकावरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी सुरक्षा कंपनीला ठेका देऊन 1000 सुरक्षारक्षक घेतले जातील. या सुरक्षारक्षकांकडून खासगी एजंटगिरी बंद करणे, बस स्थानकाच्या आवारातील गैरप्रकार रोखणे, तसेच गंभीर प्रकरणांची पोलिसांत तक्रार देणे, अशा जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. असे सुरक्षारक्षक महत्त्वाच्या बस स्थानकांवर प्राधान्याने देण्यात येणार आहेत. शिवाय जवळपास 35 लाखांच्या खर्चातून सीसीटीव्ही बसविण्यात येतील. 

रिक्षाचालकांसाठी थांबा 
एस.टी. बस स्थानकांतील मोकळ्या जागांचा विचार करून काही मोजक्‍या रिक्षाचालकांसाठी आता थांबा सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून बस स्थानकात थेट प्रवासी यावेत, बसमधून उतरलेल्या प्रवाशांना उपनगराकडे जाण्यासाठी थेट बस स्थानकात रिक्षा मिळावी, अशी सुविधा करण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांत तांत्रिक बाबी पूर्ण करून मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू होणार आहे. 

Web Title: sangli news msrtc Security guard

टॅग्स