कचरा टाकण्यावरून इस्लामपुरात खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

इस्लामपूर -  कचऱ्याचा डबा अंगणात का ठेवला? यावरून झालेल्या भांडणातून येथील यल्लम्मा चौक परिसरातील संजय रामचंद्र वडे (वय ४५) यांचा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून नीलेश शिवाजी सपाटे याने केल्याची फिर्याद इस्लामपूर पोलिस ठाण्यात संजय वडे यांचा मुलगा गणेश याने दिली आहे. सपाटे पसार झाला आहे. 

इस्लामपूर -  कचऱ्याचा डबा अंगणात का ठेवला? यावरून झालेल्या भांडणातून येथील यल्लम्मा चौक परिसरातील संजय रामचंद्र वडे (वय ४५) यांचा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून नीलेश शिवाजी सपाटे याने केल्याची फिर्याद इस्लामपूर पोलिस ठाण्यात संजय वडे यांचा मुलगा गणेश याने दिली आहे. सपाटे पसार झाला आहे. 

संजय वडे हे यल्लम्मा चौक, बुरूड गल्लीत राहतात. ते एका कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. बुधवारी (ता. १७) त्यांची भावजय पूनम यांचा शेजारी नीलेश सपाटे याच्याशी कचऱ्याचा डबा दारात ठेवण्याच्या कारणावरून वाद झाला. त्या वेळी नीलेश सपाटे याने पूनम यांना शिवीगाळ केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता संजय वडे पत्नी अनिता यांची औषधे आणण्यासाठी सांगलीला गेले.

दरम्यान, संजय यांचा भाऊ दशरथ यांचा दुपारी पुन्हा एकदा नीलेश सपाटे याच्याशी वाद झाला. वादानंतर दोन्ही बाजूंकडून शुक्रवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात किरकोळ वादावादीची तक्रार दिली होती.

दरम्यान, संजय वडे शुक्रवारी रात्री सात वाजता सांगलीहून घरी आले. थोडा वेळ घरी थांबून ते साडेसात वाजता बाहेर जाऊन येतो, असे सांगून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत; म्हणून घरच्यांनी त्यांना शहरातील आष्टा नाका, बहे नाका परिसरात शोधले; मात्र ते मिळून आले नाहीत. आज संजय यांचा भाऊ दशरथ हा नीलेश सपाटे यांचा मित्र शरद पाटील (रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) यांच्याकडे ‘नीलेश व संजय यांना तुम्ही कुठे पाहिले आहे का?’ अशी माहिती विचारण्यास गेले होते. या वेळी शरद पाटील यांनी ‘काल रात्री साडेदहाच्या

दरम्यान नीलेश हा संजय वडे यांना घेऊन आमच्या घरी आला होता. त्या वेळी त्या दोघांत भांडण सुरू होते. त्यात नीलेशने संजयला थोबाडीत मारली. मी दोघांनाही घरी जावा,’ असे म्हणून घालवल्याचे सांगितले. शरद पाटील यांच्या माहितीवरुन वडे कुटुंबीय पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते.

दरम्यान राजारामबापू दूध संघासमोरील रस्त्याकडेला अनोळखी व्यक्‍ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता ती व्यक्‍ती संजय वडे असल्याचे त्यांच्या खिशातील आधार कार्डावरून निष्पन्न झाले. पोलिसांनी वडे कुटुंबीयांना कळवले. वडे कुटुंबीयांनी घटनास्थळी भेट दिली असता संजय वडे यांच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याचे निदर्शनास आले. हा खून नीलेश सपाटे यानेच केला असल्याचे संजय यांचा मुलगा गणेश याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News Murder in Islampur