राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांची मिरजेत निदर्शने

संतोष भिसे
गुरुवार, 31 मे 2018

मिरज - राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी आज येथे स्टेट बॅंकेसमोर निदर्शने केली. संपाच्या दुसऱ्या दिवशी नऊ बॅंकांचे कर्मचारी निदर्शने आंदोलनात सहभागी झाले. शिवाजी रस्त्यावरील मुख्य शाखेसमोर आंदोलन झाले. 

मिरज - राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी आज येथे स्टेट बॅंकेसमोर निदर्शने केली. संपाच्या दुसऱ्या दिवशी नऊ बॅंकांचे कर्मचारी निदर्शने आंदोलनात सहभागी झाले. शिवाजी रस्त्यावरील मुख्य शाखेसमोर आंदोलन झाले. 

बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुरुवारपासून कामकाज पुर्णतः बंद आहे. आज दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात राहीले. अधिकारी लक्ष्मीकांत कट्टी यांनी आंदोलनाचा व मागण्यांचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबद्दल प्रधानमंत्री आणि बॅंक संघटना सकारात्मक निर्णय घेतील; पुन्हा संपाची वेळ येणार नाही अशी आशा व्यक्त केली.

स्टेट बॅंक कर्मचारी संघटना, मुंबईच्या पुणे विभागाच्या उपाध्यक्षा उल्का तामगावकर, सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी संजीवकुमार समुद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सर्व सरकारी योजना बॅंक कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने राबवल्या आहेत; त्याची योग्य परतफेड वेतनवाढीच्या रुपाने मिळाली पाहीजे.

प्रफुल्ल पाटील म्हणाले, वेतनवाढीची प्रक्रिया वेळेत पुर्ण झाली पाहीजे, बॅंक संघटनेने कर्मचारी संघटनांशी सुसंवाद साधून मार्ग काढावा. देशभरात संप यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. ग्राहकांची गैरसोय झाल्याबद्दल संघटनेतर्फे खेद व्यक्त केला.

आंदोलनात अजय गावडे, परशुराम भोरे, सरीता तावडे, भाग्यश्री वळकुंडे, पुजा मेहता, शशिकांत जोशी, शरद कोळी, निळकंठ आवळे, लक्ष्मीकांत कट्टी, अरविंद चौगुले, किमया उकीडवे, मोहन जोशी, शिवशंकर घाडगे, बाबासाहेब कोरुचे, गीता मडकपकर, अनिल इनामदार, संजय देशपांडे आदींनी सहभाग घेतला.
 

Web Title: Sangli News National Bank workers agitation in Miraj