गणराया..आयुक्तांना सुबुध्दी द्या - राष्ट्रवादी

गणराया..आयुक्तांना सुबुध्दी द्या - राष्ट्रवादी

सांगली - आयुक्तांना विकास कामाबाबत सुबुद्धी दे, असे साकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी गणरायाला घातले. पक्षाने आज तिसऱ्या दिवशीही सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले आहे. कामे सुरू झाल्याशिवाय माघार नाह, असा इशारा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी दिला. 

वार्डातील विकासकामे अडविली जात असून ती मार्गी लागावीत या मागणासाठी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसापासून पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने गणरायाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलन स्थळी डिजीटल फलकही लावून आयुक्तसाहेब आता तरी विकासकामे थांबवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांची पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, सागर घोडके, विनया पाठक, प्रकाश व्हनकडे, मनोज भिसे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. अंदाजपत्रकातील समाविष्ट असलेल्या कामांना मंजुरी देऊन वर्कऑडर द्याव्यात, नगरसेवकांना इंटरेस्ट असल्याचे सांगून विकासकामे अडविले जात आहे. त्यातून जनतेची दिशाभूल होत असून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

नगरसेवक विष्णु माने, प्रा. पद्माकर जगदाळे, अल्लाउद्दीन काझी, आशा शिंदे, संगीता हारगे, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, अंजना कुंडले, स्नेहल सावंत, आनंदा देवमाने, अभिजित हारगे, प्रसाद मदभावीकर आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी? 
नगरसेवक-पदाधिकारी विरुद्ध आयुक्तांमधील संघर्षात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली असून दोन दिवसात चर्चा घडवून मार्ग काढण्याचा शब्द त्यांनी दिला. तथापि श्री बजाज यांनी निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेतला. लवकरच रितसर चर्चा करून आंदोलन मागे जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com