इस्लामपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिनींचा महावितरणवर हल्लाबोल

धर्मवीर पाटील
बुधवार, 21 मार्च 2018

इस्लामपूर -  येथील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज राजारामनगर व निनाईनगरातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिनींनी हल्लाबोल केला. निनाईनगरातील खांब व तारा तातडीने काढण्याचे निवेदन यावेळी महिलांनी दिले. खांब व तारा तातडीने न काढल्यास अधिकाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. रुपाली खंडेराव जाधव, नगरसेविका जयश्री सदानंद पाटील यांनी महिलांचे नेतृत्व केले.         

इस्लामपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील निनाईनगर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नगरपरिषदेच्या मालकीचा आहे. या रस्त्यावर महावितरण कंपनीने नगरपरिषदेस कोणतीही पूर्वसूचना न देता ३३ केव्ही. व ११ केव्हीचा पोल घातला आहे. गेल्या ४ महिन्यापूर्वी हे काम सुरू असताना रूपाली जाधव, जयश्री पाटील, मेघा लाड, सदानंद पाटील, प्रकाश जाधव यांनी या कामावर आक्षेप घेवून हे काम बंद पाडले होते.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, सहाय्यक कार्यकारी अभियंता सारिका गुजले, महेश पाटील तसेच नगरपरिषदेचे इलेक्ट्रिक विभागप्रमुख अनिकेत हेंद्रे उपस्थित होते. त्यानंतरही ठेकेदाराने हे काम पूर्ण केले. त्यामुळे या रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तरी १५ दिवसात हा रस्ता मोकळा करून द्या, नाहीतर महिलांच्या तीव्र आंदोलनास सामोरे जावा, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. मेघा राजवर्धन लाड, वंदना माळी, अलका ढाले, वैजंता रहाटे, शालन कदम, अनुसया कदम, आक्काताई पाटील, वर्षा पाटील, कल्पना कुरणे, स्वालिया आत्तार, शिल्पा दिक्षीत, रंजना कदम, अरुणा परब, मीनाक्षी यादव, सुनीता कदम यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Sangli News NCP agitation for removal of Poll