संकलित कर प्रकरणी काम करू न देण्याचा इस्लामपुरात राष्ट्रवादीचा इशारा

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 9 मार्च 2018

इस्लामपूर - शहरातील नव्या २४७२ मालमत्ताधारकांना १०० टक्के रक्कम भरण्याच्या दिलेल्या नोटीसा अन्यायकारक आहेत, नागरिकांनी ५० टक्के रक्कम भरूनच अपील करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केले. गेली दीड वर्ष विकास आघाडी नागरिकांना सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून ही वसुली न थांबविल्यास काम करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शहरअध्यक्ष शहाजी पाटील, युवकचे अध्यक्ष खंडेराव जाधव, नगरसेविका जयश्री माळी, सदानंद पाटील उपस्थित होते.

शहाजी पाटील म्हणाले, "गेली ३० वर्षे राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात प्रारंभी ३० टक्के आणि नंतर ५० टक्के रक्कम भरून घेऊन अपिलात नागरिकांना सवलत दिली होती. प्रशासन आणि नवे सत्ताधारी १०० टक्के रक्कम भरण्याचे तोंडी आदेश देऊन पिळवणूक करत आहेत. जिल्ह्यातील अन्य पालिकांमध्ये ५० टक्के रक्कम भरून घेतली जात असताना इस्लामपूरातच वेगळा न्याय का? कायद्यातील तरतूद डावलून वसुली सुरू आहे."

मलगुंडे म्हणाले, "सन २०१६ च्या आधी आम्ही अपील समितीच्या माध्यमातून ५० ते ६० टक्के सवलती दिल्या. हे चुकीचा पायंडा पाडत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण निधीचे २ कोटी भुयारी गटरला वर्ग केल्याने पैशांचा तुटवडा आहे. तो भरून काढण्यासाठी मालमत्ताधारकांना भुर्दंड बसवला जात आहे."

खंडेराव जाधव म्हणाले, "नागरिकांनी १०० टक्के रक्कम भरल्यास हा नियम मान्य असल्याचे अपील समिती गृहीत धरेल, सवलत मिळणार नाहीच; उलट कायमस्वरूपी पूर्ण रक्कम भरण्याचा तोटा सहन करावा लागेल. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार करू नये. करात राजकारण आणू नये." दादासो पाटील म्हणाले, "कराबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना न्याय मागू. योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करू. उपोषण करू आणि न्याय मिळवून देऊ."

विकास आघाडीचेच पाप
अजिबात कर न भरता अपील करा म्हणणारे आज सत्तेत आहेत. 'त्या' १२०० जणांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यांच्या नुकसानीचे पाप विकास आघाडीचेच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Web Title: Sangli News NCP warns not to work in compiling tax