राष्ट्रवादी महिला आघाडीचा पक्षाच्‍या मजबुतीत वाटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - ‘राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षवाढ, संघटना मजबूत करण्यासाठी महिला आघाडीकडून जिल्ह्यात मोठा वाटा उचलला जाईल. प्रत्येक तालुक्‍यात संपर्क दौरा करून महिलांना एकत्रित केले जाईल. 

आगामी ग्रामपंचायती निवडणूक पार्श्‍वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्‍याने आपापले योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील यांनी आज केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महिला आघाडी बळकटीकरणाबाबत अनेकांची भाषणे झाली. तालुकाध्यक्षांनी आपापल्या भागातील स्थिती बैठकीत मांडली. त्यांच्या अडचणींचा विचार करून काही दिवसांत सुधारणा, तसेच नेमकी भूमिका घेतली जाईल, असेही सौ. पाटील यांनी सांगितले. 

वाळवा तालुकाध्यक्ष सुश्‍मिता जाधव, इस्लामपूर शहराध्यक्ष रोझा किणीकर, मिरज तालुकाध्यक्ष अनिता कदम, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष सुरेखा कोळेकर, तासगाव तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, पलूस तालुकाध्यक्ष नंदाताई पाटील, सांगली विधानसभाध्यक्ष छायाताई जाधव आदींनी चर्चेत भाग घेतला. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, श्रीमती लीलाताई जाधव, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, जत तालुकाध्यक्ष बसवराज दोडमणी, मिरज तालुकाध्यक्ष अप्पासाहेब हुळ्ळे, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, युवक प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन जानकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनायक मुगळे, जिल्हा सचिव मनोज भिसे उपस्थित होते. 

Web Title: sangli news ncp women