बारा आंबे खात नऊ वर्षांच्या मुलीने जिंकली स्पर्धा

विजय पाटील
रविवार, 10 जून 2018

सांगली - मनसोक्त आंबे खा अन् बक्षीस मिळवा अनोखी स्पर्धा बालगोपालांसाठी येथील जनहित या सामाजिक संस्थेने आयोजित केली होती. यात 90 हून अधिक बालगोपालांनी ६०० आंबे फस्त केले. बारा आंबे खात एका नऊ वर्षांच्या मुलीने ही स्पर्धा जिंकली. राजनंदिनी कुबडगे असे त्या विजेत्या मुलीचे नाव आहे.

आंबा खायचा मोह खरं तर कोणालाच आवारता येत  नाही.  त्यातही बच्चे कंपनी तर आंब्यावर तुटून पडत असते. आणि जर का आंबा खाण्याच्या स्पर्धा ठेवली तर मग काय विचारायला नको. अशीच स्पर्धा सांगलीच्या हरिपूरमध्ये पार पडली. ज्यामध्ये बच्चे कंपनीने तब्ब्ल सहाशे आंबे फस्त केले. 

सध्या आंब्याचा हंगाम संपत आला आहे. महागडा समजला जाणारा आंबा सहसा मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबातील मुलांना मोजक्या प्रमाणात चाखायला मिळतो. त्यामुळे अशा मुलांना हे आंबे मनसोक्त खाता यावे या उद्देशाने जनहित सेवा संस्थेकडून हरिपूरमध्ये ही आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. १० वर्षांखालील वयोगटासाठी पार पडलेल्या या स्पर्धेत हरिपूर आणि आसपाच्या तब्ब्ल ९० हुन अधिक मुलांनी सहभाग नोंदवला. जास्त आंबा खाणाऱ्या मुलांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. एका हॉलमध्ये सगळ्यांना रांगेत बसवून समोर त्यांच्या आवडीचे फळ आंबा ठेवण्यात आले आणि मग काय एकामागून एक आंबे त्यांच्या प्लेटमध्ये पडत होते. भाग घेतलेल्या मुलांनी अगदी आनंदाने या आंब्यावर ताव मारला.

 मनसोक्त आंबे खाण्याच्या या स्पर्धेत राजनंदिनी कुबडगे या ९ वर्षीय चिमुकलीने तब्बल १२ आंबे फस्त करत पहिला येण्याचा बहुमान पटकावला. या मुलीला शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आले.

Web Title: Sangli News nine years old girl eat 12 mangoes and win competition