सत्तर हजारांचे दागिने लंपास करणारा मिरजेत ताब्यात

संतोष भिसे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मिरज - सराफाच्या हातातील सत्तर हजारांचे दागिने हिसडा मारुन पळवून नेणाऱ्या लक्ष्मण नाईक (लिंगनूर, ता. मिरज ) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याचा साथीदार संशयित सचिन कांबळे फरारी आहे.

मिरज - सराफाच्या हातातील सत्तर हजारांचे दागिने हिसडा मारुन पळवून नेणाऱ्या लक्ष्मण नाईक (लिंगनूर, ता. मिरज ) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याचा साथीदार संशयित सचिन कांबळे फरारी आहे.

गुरूवारी ( ता, 1 ) खटाव ( ता. मिरज  ) येथे हा प्रकार घडला. सोनाली सतीश गिड्डे ( रा. खटाव ) यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दोघे संशयित आणखी दोघा साथीदारांसह आले. लग्नासाठी दागिने खरेदी करणार असल्याचे सांगितले. दोन टॉप्स, कानातील साखळ्या, सोन्याचे सहा मणी, शिंपले, लाखी मणी असे सत्तर हजारांचे दागिने खरेदी केले. सौ. गिड्डे खरेदीची पावती करत असतानाच लक्ष्मण नाईक याने त्यांच्या हातातील दागिन्यांच्या पिशवीला हिसडा मारला व पळून गेला. तक्रारीनंतर येताच पोलिसांनी नाईक याला आज अटक केली. 
 
Web Title: Sangli News one arrested in jewelry theft case

टॅग्स